आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️राजोली येथे “राष्ट्रीय ग्राहक दिन” उत्साहात साजरा..

▪️ग्रामीण भागातील ग्राहकांचे शोषण थांबविण्यासाठी ग्राहक जागृती आवश्यक चर्चासत्रातील सूर..

 

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : ग्रामीण भागातील ग्राहकांचे शोषण व लूबाडणुक थांबविण्यासाठी ग्राहक जागृती आवश्यक आहे असा एकमुखी सूर निघाला असून २४डिसेंबर रोजी तहसील कार्यालय मूल व जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत यांचे सौजन्याने चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील राजोली ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित चर्चासत्रात वक्त्यांनी व्यक्त केलेल्या मतांवरुन स्पष्ट करण्यात आले आहे.
२४ डिसेंबर २०२५रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले पाहिजे आणि हे आयोजन केवळ एक औपचारिकता न राहता शासनाच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनतेला शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी त्यांची उपस्थिती आणि ग्राहक चळवळीत सक्रिय पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा शासननिर्णय असून त्यानुषंगाने सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सुचित करण्यात आले आहे आणि त्यांचे वतीने सर्व तहसीलदार आणि तहसील कार्यालयाला कळविण्यात आले असून बहुतेक तहसील कार्यालयात हा कार्यक्रम आटोपून घेण्याचा खटाटोप सुरू होता.
जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांताचे वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतेक तहसील कार्यालयात संपर्क साधून राष्ट्रीय ग्राहक दिन २४डिसेंबर च्या मागेपुढे पंधरवाड्यात तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये घेण्याविषयी आग्रही भूमिका घेतली आणि त्यामुळे काही ठिकाणी निवडणूक आचारसंहिता तर काही ठिकाणी गुड गव्हर्नन्स सप्ताहा चे कारण दर्शवित कार्यक्रम आयोजित करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे मात्र जागृत ग्राहक राजाचे सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि तहसीलदार यांचे सोबत साधलेल्या संवादातून, जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेशी झालेल्या संवादातून आता हे कार्यक्रम होऊ लागले आहेत. खरेतर हा जागृत ग्राहक राजाच्या यशस्वी पाठपुराव्याचा विजयच आहे.
राजोली गावचे सरपंच जितेंद्र लोणारे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मूल तालुक्यातील या दुसऱ्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून दीपक देशपांडे अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत, किशोर शिंदे गटविकास अधिकारी पंचायत समिती मूल,विजय पंदिले नायब तहसीलदार मूल, राजेश शिरभाते निरिक्षण अधिकारी तहसील मूल, रमेश डांगरे चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य,दीपक दंडारे वैध वजनमापे निरिक्षक, अजिंक्य भंगिरे पोस्ट मास्तर राजोली यांची उपस्थिती होती.
पाहुण्यांच्या स्वागत समारंभानंतर गटविकास अधिकारी किशोर शिंदे यांनी प्रास्ताविक करताना ग्राहक ,ग्राहक संरक्षण कायदा,आणि ग्राहक जागृतीची आवश्यकता व फसवणूक टाळण्यासाठी या कायद्याच्या सहकार्याने आपण न्याय मिळवू शकतो हे पटवून दिले आणि म्हणूनच जनतेला त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी अशा आयोजनाची आवश्यकता स्पष्टकरीत जनतेने या आयोजनाचा लाभ घ्यावा व आपली फसवणूक होणार नाही यासाठी आपले हक्क समजून घ्यावे असे आवाहन केले.
रमेश डांगरे यांनी ग्राहक या शब्दाची व्याप्ती ग्राहकांचे हक्क व फसवणूक प्रकार आणि फसवणूक टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर आढावा घेताना बी बियाणे,खते यांबाबत फसवणूक प्रकार आणि उपाययोजनांची माहिती दिली ,न्यायालयीन प्रक्रियेत असणारी सहजसुलभता स्पष्ट केली व ग्राहकांनी संवाद समन्वयातून आपल्या अडचणी तक्रार रुपात मांडण्याचा सल्ला दिला.
दीपक देशपांडे अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत यांनी ग्राहक या शब्दाची व्याप्ती, सद्यस्थितीत उपलब्ध असणाऱ्या सुखसोयी , फसवणूक प्रकार त्यावर उपाययोजना, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार कशी करायची , तेथील तक्रारी वकिलांच्या शिरकाव्यामुळे कशा प्रलंबित आहेत याविषयी माहिती दिली ,व यांमुळे आपण तक्रार करणे सोडून चालणार नाही हे स्पष्ट केले.
बाजारपेठेतील वजनमापे,भेसळ, शुद्धतेची आणि वेगवेगळ्या सेवा मिळवताना होणारी लूट उजागर करताना, वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी न होणे ही आक्षेपार्ह बाब असून आम्ही कुणाच्या विरोधात नाही परंतू शोषण कोणत्याही प्रकारचे असले तरी ते खपवून घेतले जाणार नाही यासाठी तालुका प्रशासनाने आवश्यक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थिती ची कारणमीमांसा करावी व त्यांचेवर उचीत कार्यवाही करावी कारण या कार्यक्रमात ग्राहकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दिली जाते, आणि शेतकरी असो वा सर्वसामान्य नागरिकांना एका कामासाठी वारंवार चकरा माराव्या लागणे हेही शोषणच असून ग्राहकांना संबंधित अधिकारी अनुपस्थित असेल तर त्याची नोंद हलचल रजिस्टर मध्ये केली जाते आणि ते नागरिकांना उपलब्ध असणे हेही आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले व अशा कार्यक्रमातून याबाबत सविस्तर माहिती दिली जाते व ग्राहकांना वारंवार हेलपाटे मारावे लागणार नाही अशाप्रकारची जनजागृती होत असते आणि म्हणूनच याबाबत जागरूकता निर्माण करणे ,जनतेचा सहभाग वाढविणे आवश्यक झाले आहे असे मत व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात सरपंच जितेंद्र लोणारे यांनी वजनमापांतील तफावत व ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जाते गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आणि वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशा कार्यक्रमांना उपस्थित राहून सहकार्य करावे व जनतेला व ग्राहकांना वेळीच माहिती पुरवावी जे कधी घडतच नाही असे स्पष्ट करीत आपल्या अधिकारांसाठी मान्यवरांच्या विचारांशी सहमत असून जनतेच्या जनजागृतीसाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन महत्वाचे असल्याचे मत व्यक्त केले, ग्राहकांच्या फसवणुकीच्या प्रकारांचा बंदोबस्त करण्यासाठी जनजागृती ची आवश्यकता व्यक्त केली.
या कार्यक्रमात विद्यार्थी विद्यार्थिनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसेवक टिकले यांनी सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.