▪️मुरखळा येथील रोशन बोदलकर गडचिरोली मॅरॅथाॅन स्पर्धेत अव्वल..
▪️सलग तिन वर्ष पटकाविला अव्वल क्रमांक..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
कुनघाडा रै – ( इंडिया 24 न्युज ) : गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने २८ डिसेंबर रोजी मॅरॅथाॅन स्पर्धा घेण्यात आली असून, चामोर्शी तालुक्यातील मुडखळा माल येथिल रोशन पितांबर बोदलकरयाने २१ किमी अंतर पुरुष गटात महा मॅरॅथाॅन स्पर्धेत लगातार तिन्ही वर्ष प्रथम आला आहे
त्याला ५१ हजार रुपये रोख, ट्राॅफी, पदक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम, आ. डॉ. मिलिंद नरोटे, पोलिस महासंचालक छेरिंग दोरजे, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदिप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महानिरीक्षक अजय शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, गोंडवाना विद्यापीठाचे कुल गुरू डॉ. प्रशांत बोकारे, लाॅयड मेटलस लीमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन, अप्पर जिल्हाधिकारी नितिन गावडे उपस्थित होते त्यांच्या सुयशाबद्दल मुरखळा ( माल ) चे सरपंच भास्कर बुरे, विठ्ठल आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष हभप धनराज महाराज नागापुरे, उपसरपंच लक्ष्मी सालोरकर, तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर पोटे, कांग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख विजय लाड, शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष रुपाली मुमडवार, लोकमान्य विद्यालयचे मुख्याध्यापक प्रकाश पत्रे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गणेश बोईनवार, भारतरत्न राजीव गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माधुरी बोनगिरवार, पोलिस पाटील अनिल कुकुडकर, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र बारसागडे, मुन्ना गटलेवार, राजू झाडे, प्रशांत रस्से, साक्षी निकुरे आदींनी त्याचे अभिनंदन केले आहे.



