आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️सुभाष कासनगोटूवार यांची भाजप चंद्रपूर महानगर अध्यक्ष पदावरून हकालपट्टी..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : चंद्रपूर शहर महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप पक्षाच्या उमेदवारी वाटपावरून वाद विवाद सुरू असताना भारतीय जनता पार्टीने चंद्रपूर शहरात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचा निर्णय घेतला असून भाजप चंद्रपूर महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांची तात्काळ प्रभावाने पदावरून मुक्त करण्यात आली आहे. हा निर्णय दि. 31 डिसेंबर 2025 रोजी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला.

चंद्रपूर मनपा निवडणुकीत ‘चंद्रपूर शहर महानगर विकास आघाडी भारतीय जनता पार्टी – महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाकडून यासंदर्भात अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे. सदर पत्रात सुभाष कासनगोट्टूवार यांना संबोधित करत. त्यांची भाजप चंद्रपूर महानगर अध्यक्ष पदावरून तात्काळ पदमुक्ती करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. “आपण याची नोंद घ्यावी,” असे नमूद करत पक्षाने हा निर्णय स्पष्ट केला आहे.

या आदेशावर भाजप महाराष्ट्राचे कार्यालय सचिव श्री. मुकुंद कुलकर्णी यांची स्वाक्षरी असून, प्रत म्हणून हा निर्णय मा. डॉ. उपेंद्र कोठेकर, विभाग संघटन मंत्री – विदर्भ विभाग यांच्याकडेही पाठविण्यात आला आहे. यामुळे हा निर्णय उच्च पातळीवर घेण्यात आल्याचे स्पष्ट होते.
दरम्यान या निर्णयामागील नेमकी कारणे अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी चंद्रपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून संघटनात्मक पुनर्रचना केली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नेतृत्वात बदल करून पक्ष अधिक बळकट करण्याचा प्रयत्न असल्याचे संकेतही या निर्णयातून मिळत आहेत.
या घडामोडीमुळे चंद्रपूरच्या राजकारणात खळबळ उडाली असून पुढील काळात भाजप चंद्रपूर महानगर अध्यक्षपदाची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.