▪️स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी मोठी कारवाई एम.डी. ड्रग्सविरोधात पोलिसांची धडक..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : शहरात अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी मोठी कारवाई करत एम.डी. (मेथाडोन/मेफेड्रोन) अमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका विधी संघर्ष बालकास ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४८.१६० ग्रॅम वजनाची एम.डी. पावडर, एक मोबाईल व रोख रक्कम असा एकूण २ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रयतवारी कॉलरी, चंद्रपूर परिसरात छापा टाकला. या कारवाईत विधी संघर्ष बालकाच्या ताब्यातून एम.डी. अमली पदार्थ पावडर (४८.१६० ग्रॅम, किंमत अंदाजे २,४०,००० रुपये), जुना वापरता मोबाईल (अंदाजे ५,००० रुपये) तसेच रोख रक्कम ३९,००० रुपये असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी सदर विधी संघर्ष बालकासह सैफुउद्दीन सिद्दीकी (रा. रयतवारी कॉलरी, चंद्रपूर) व श्रीकांत डुंबरे (रा. वाठोडा, नागपूर) या आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे गुन्हा क्रमांक ११०१/२०२५ अंतर्गत कलम ८(क), २२(ब), २९ एन.डी.पी.एस. कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि सुनील गौरकार, पोहवा नितीन साळवे, नितीन कुरेकार, सुभाष गोहोकार, सचिन गुरनुले, प्रमोद कोटनाके, परवरिश शेख, पोअं. शशांक बादामवार, प्रसाद धुळगुंडे, चासफौ प्रमोद डंबारे आदींचा समावेश होता.
अंमली पदार्थांचे सेवन, साठवणूक किंवा खरेदी-विक्री करणे कायद्याने गुन्हा असल्याचे स्पष्ट करत चंद्रपूर पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे. अशा प्रकारची माहिती मिळाल्यास व्हॉट्सअॅप क्रमांक ७८८७८९०१०० वर कळवून चंद्रपूर नशामुक्त करण्याच्या मोहिमेत सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



