▪️अपघातग्रस्त खातेदाराच्या कुटुंबास दोन लाखांचा धनादेश वितरित..
▪️प्रधानमंत्री जीवन ज्योति सुरक्षा विमा योजने अंतर्गत मिळाला लाभ..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : को. आॅप. बैंक शाखा चामोर्शीच्या वतीने राबविण्यात येण्या शासनस्तरीय प्रधानमंत्री जीवन ज्योति सुरक्षा विमा योजने अंतर्गत बैंकेच्या खातेदाराच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांचा विमा धनादेश वितरित करण्यात आला
बैंकेच्या खातेदार आमगांव महाल येथील संगीता दिवाकर जुवारे यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिने आपल्या समृद्धी खात्यावरून केवळ २० रुपये वार्षिक हप्त्याचा विमा बैंकेकडून काढुन घेतला होता मात्र दुर्देवाने त्यांचा अचानक अपघाती मृत्यु झाल्याने, विमा योजने अंतर्गत विमा कंपनीकडुन मिळालेला दोन लाख रुपयांचा धनादेश त्यांचे पती दिवाकर जुवारे यांना वितरित करण्यात आला
हा धनादेश वितरणाचा कार्यक्रम को. आॅप. बैंकेचे संचालक अमोल गण्यारपवार तसेच शाखा व्यवस्थापक अरुण पत्रे,निरिक्षक हरिहर जिभकाटे, श्रिकांत यज्ञूरवार, मंगेश येनगंटिवार, पवन दुधबळे , प्रियंका येगुंलवार, वैशाली जुवारे, अर्चना कुंभरे, विक्की ऐलावार व आकाश आदि कार्यलयीन कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी बैंकेच्या वतीने कुटुंबीयांचे सांत्वना करण्यात आले
प्रधानमंत्री जीवन ज्योति सुरक्षा विमा योजना ही अल्प हप्त्यात मोठे आर्थिक संरक्षण देणारी योजना असून, अशा प्रकारच्या योजनांचा लाभ सर्व खातेदारांनी घ्यावा असे आवाहन यावेळी बैंक प्रशासनाकडून करण्यात आले या घटनेमुळे विमा योजनेचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, गरजेच्या वेळी अशा योजनांमुळे कुटुंबाला मोठा आधार मिळतो , असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



