ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️कोमरय्या सुरमवार यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून न्याय मिळवून देणार..

▪️माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांचे पीडित कुटुंबाला आश्वासन!

 

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

अहेरी – ( इंडिया 24 न्युज ) : दामरांचा येथील रहिवासी असलेले कोमरय्या सुरमवार यांचा मृत्यू अत्यंत संशयास्पद परिस्थितीत 24/10/2025 रोजी झालेला होता,सदर प्रकरणामुळे कुटुंबीय व परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता व संताप निर्माण झाला आहे.आजपर्यंत झालेली चौकशी अपुरी व असमाधानकारक होती.गेल्या तीन महिन्या पासून खऱ्या दोषींवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

त्यामुळे सुरमावार कुटूंबातील सदस्यांनी अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांना निवेदन देऊन कोमरय्या सुरमवार यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या सर्व आरोपीना शिक्षा देऊन सुरमवार कुटूंबाला न्याय मिळवून द्या अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

निवेदन स्वीकारून राजे साहेबांनी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री सन्मानीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून या प्रकरणाची संबंधित यंत्रने मार्फत सखोल व स्वतंत्र चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करून कुटुंबाला न्याय मिळवून देणार असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

तसेच पीडित कोमरय्या सुरमावर यांच्या कुटूंबाला संरक्षण,योग्य कायदेशीर मदत मिळावी,यासाठीही आपण विशेष लक्ष घालानार,असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी ज्योती कोमरय्या सुरमवार,निर्मला मुलकालवार,शकुंतला चौधरी,सरोजना सुरमवार,रजनीता सुरमवार तसेच दामरंचा येथील गावकरी उपस्थित होते.!

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.