▪️शेतकरी नोंदणी विषयीची खात्री करून घ्यावे-कृ. उ. बा. स. मूल कडून तालुक्यातील धान उत्पादकांना नम्र आवाहन

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल : मूल तालुक्यात धानाचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेतल्या जातो.मूल तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२५-२०२६ करिता शासकीय आधारभूत धान खरेदी करिता कृषी उत्पन्न बाजार समिती, मूल चे केंद्रावर शेतकरी नोंदणी करिता अर्ज सादर केलेले असून शेतकरी नोंदणी अर्जाची डाटा एन्ट्री करण्यात आलेली असून अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी झाल्याबाबतचे मेसेज येत नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. ज्या शेतकऱ्यांनी कृ. उ. बा. समिती मूल चे केंद्रावर शेतकरी नोंदणी करिता अर्ज सादर केलेले आहे, त्यांनी आपली नोंदणी झालेली किंवा नाही तसेच, अर्जासोबत जोडण्यात आलेले ७/१२ ची डाटा एन्ट्री झालेली आहे किंवा नाही याबाबतची खात्री करण्याकरिता कृ. उ. बा. समिती मूल चे कार्यालयात दिनांक ३१जानेवारी २०२६ पर्यंत सकाळी ११. ००ते ४. ०० वाजेपर्यंत सोबत आधार कार्ड आणून खात्री करून घ्यावी असे आवाहन कृ. उ. बा. समिती मूल चे सभापती श्री. राकेश या. रत्नावार व उपसभापती श्री. राजेंद्र दे. कन्नमवार तसेच, सर्व संचालक मंडळ आणि सचिव यांचेकडून करण्यात आलेले आहे.
दिनांक ३१जानेवारी २०२६ पूर्वी स्वतःची शेतकरी नोंदणी ची खात्री करून न घेतल्यास यांस कृषी उत्पन्न बाजार समिती मूल जबाबदार राहणार नाही, असेही कृ.उ. बा. समिती मूल कडून कळवीण्यात आलेले आहे.



