▪️टाटा एस वाहन उलटले,चार विद्यार्थी गंभीर..सातजण किरकोळ जखमी..
▪️एस टी बस न आल्यामुळे टाटा एस ने केला प्रवास..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – (इंडिया २४ न्यूज ) : विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी टाटा एस उलटली; चार विद्यार्थी गंभीरमूल तालुक्यातील मारोडा गावाजवळील घटना; सातजण किरकोळमूल वेळेवर बस न आल्याने शाळेला उशीर होईल, या भीतीपोटी टाटा एस वाहनातून प्रवास करणे शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले. उश्राळा येथून मारोडाकडे जाणारी टाटा एस (क्र. एमएच ३४, ८१३९) रस्त्याच्या कडेला उलटल्याने झालेल्या अपघातात चार विद्यार्थी गंभीर तर सात विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाल्या. ही घटना शुक्रवारी (दि. १६) सकाळी १०. ०० वाजेच्या सुमारास मारोडा गावाजवळ घडली.काजल बंडू नर्मलवार, लखन जगदीश नर्मलवार, कल्याणी राजू भांडवगडे आणि काजल प्रवीण शेंडे या चार मुलींना डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर प्रतीक्षा रवींद्र मार्गनवार, मनस्वी तानाजी जिलमवार, सारिका नामदेव मशाखेत्री, राणी राजू मांडवगडे, वैष्णवी राजू आलाम, समीक्षा जगदीश नर्मलवार आणि तुनज अनिल जेंगठे या सात विद्यार्थिनींच्या हाता पायाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. उश्राळा येथील १४ ते १६ वयोगटातील शाळकरी मुली मारोडा येथील विश्वशांती विद्यालयात शिक्षण घेत असून, त्या दररोज महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसने ये-जा करतात. मात्र शुक्रवारी बस वेळेवर न आल्याने शाळेला उशीर होईल, या भीतीने मुलींनी टाटा एस वाहनात बसून प्रवास सुरू केला. चालकाचे प्रवासादरम्यान वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला उलटली.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी मुलींना मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी चार मुलींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून, वाहनचालकास ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

