ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️सभापतिपदाच्या निवडीची उत्सुकता शिगेला..

▪️गडचिरोली न. प. च्या स्थायी व विषय समिति सभापति पदासाठी निवडणूक २१ जानेवारी रोजी..

 

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : गढ़चिरौली येथील नगरपरिषदेच्या स्थायी समिती व विषय समिती सभापतिपदासाठी २१ जानेवारी रोजी नगपरिषदेच्या सभागृहात निवडणूक घेण्यात येणार आहे सकाळी १० वाजतापासून सभापतिपदाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे त्यामुळे सभापतिपदाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे
१५ जानेवारी रोजी नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक नगराध्यक्ष अॅड प्रणोती निंबोरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली दरम्यान स्वीकृत नगरसेवकांचीही निवड करण्यात आली होती नगराध्यक्ष व उपाध्यक्षांनी पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर शहरवासीयांचे लक्ष विषय समिती सभापतिपदाकडे लागले आहे जिल्हाधिकान्यांनी गढ़चिरौली नगरपरिषदेच्या विषय समिती व स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार २१ जानेवारी रोजी सकाळी १० ते ११ वाजेपर्यत स्थयी व विषय समित्यांच्या ठरविलेल्या सदस्यांच्या संख्या अवगत करुन देणे त्यानंतर नगरपरिषद उपाध्यक्ष हे कोणत्या विषय समितीचे सभापती राहतील हे ठरविणे व नंतर विषय समितीवर सदस्यांची नामानिदेशन स्वीकारणे सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यत सभापतिपदाकरिता नामनिर्देशन पत्र नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकाडे सादर करणी दुपारी १ वाजता पिठासीन अधिकारी हे सभेला सुरुवात करतील दरम्यान विषय समिती सभापतिपदासाठी आलेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी वैधपने नामनिर्देशन उमेदवारांच्या नावांचे वाचन उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरिता पिठासीन अधिकारी हे १५ मि वेळ घोषित करतील उमेदवारी मागे घेणान्यांची नावे वाचून दाखवतील व आवश्यकता वाटल्यास विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी निवडणूक घेणे आवश्यकता वाटल्यास महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतिपदासाठी निवडणूक घेणे यानंतर पिठासीन अधिकारी निकाल घोषित करतील त्यांनंतर स्थायी समिती गठित केली जाईल २१ जानेवारी रोजी नगरपरिषदेच्य विषय समिती व स्थायी समितीची निवडणूक होत असल्याने सभापतिपदावर कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
गडचिरौली नगरपरिषदेवर भाजपाचे १५ नगरसेवक विजयी झाल्याने भाजपाची एकहाती सत्ता आली आहे त्यामुळे भाजपाचे विजयी नगरसेवक विषयी समिती सभापतिपद मिळविण्यासाठी गचडघ्याला बाशिंग बाधुन असल्याची चर्चा शहरात सुरू आहे मात्र भजपा पक्षश्रेष्ठी कुणाच्या गळ्यात सभापतिपदाची हार घालणार अशी उत्सुकता सर्वानाच लागली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.