ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️सुभाष ग्राम – घोट रास्त्याची दुरावस्था त्वरित दुरूस्तीची सरपंच कृष्णा मंडल यांची मागणी..

 

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : सुभाष ग्राम ते घोट या महत्त्वाचा रस्ताची अवस्था गेल्या अनेक दिवासांपासून अतिशय दयनीय झालेली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत या खड्डयांमुळे वाहनधारक व पादचान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे विशेषत:शाळकरी विद्यार्थी रुग्णवाहिका दुचाकीस्वार व शेतकारी यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे
सदर रस्त्याशरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहयूक होत असून पावसाळयाच्या दिवसात खड्डयांमध्ये पाणी साचल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे अनेक वेळा वाहनांचे नुकसान होत असून किरकोळ अपघातांच्या घटनाही घडत आहेत मात्र याकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जाणीपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे
या पार्श्र्वभूमीवर ग्राम पंचायतचे सरपंच कृष्णा मंडल यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सदर रस्त्याची त्वरित दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे
हा रास्ता ग्रामीण भागातील नागरिकांसठी जीवनवाहिनी अहे मात्र प्रशासन डोळेझाक करत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे
जर तात्काळ उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर ग्रामपंचायतच्या सरपंच व ग्रामवासिया वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशाराही त्यांनी दिला आहे
स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस करवाई होत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे त्यामुळे संबंधित विभागाने परिस्थितिचे गांभीर्य ओळखुन त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी ग्रामपंचायत सरपंच कृष्णा मंडल यांच्यासह सर्व स्तरातून मागणी होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.