आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️सिंदेवाही येथे मांडूळ साप प्रकरणी सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी..

 

धनराज सरपाते – सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

सिंदेवाही – ( इंडिया २४ न्यूज ) : दि. १५/०२/२०२६ ब्रह्मपुरी वन विभागांतर्गत सिंदेवाही वन परिक्षेत्रातील उपक्षेत्र नवरगाव, नियतक्षेत्र रत्नापूर येथे अनुसूची -१ मधील संरक्षित मांडूळ प्रजातीचे साप बाळगल्याप्रकरणी वनविभागाने सहा आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने जामीन नामंजूर करून सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून, त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृह चंद्रपूर येथे करण्यात आली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी, कु. अंजली सायंकर (बोरावार) यांच्या नेतृत्वाखाली १० फेब्रुवारी २०२६ रोजी गस्ती दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान श्री हिवराज शामराव गाहाणे (रा. रत्नापूर) यांच्या घरी प्लास्टिक पिशवीत मांडूळ प्रजातीचे साप आढळून आले.
याप्रकरणी आरोपी म्हणून अशोक धोंडूजी आत्राम (रा. रत्नापूर ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर), ईश्वर दुर्योधन शेंडे (रा.धामणगाव चक ता. नागभिड जि. चंद्रपूर), निर्मल अनिल हालदार (रा. नेताजीनगर ता. चामोर्शी जि. गडचिरोली), सरोज सिबु मालो (रा. सुंदरनगर ता. मुलचेरा जि. गडचिरोली ), अनिल गोविंदा मेश्राम (रा. रत्नापूर ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर) यांच्या विरुद्ध वनगुन्हा क्रमांक ०९११२/२२७७९४ दि.१०/०२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
चौकशी दरम्यान विजय गणू ढोलणे (रा. पेंढरी ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर) त्यांचाही सहभाग आढळून आल्याने त्यांच्याविरुद्धही कारवाई करण्यात आली. सर्व सहा आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, सिंदेवाही न्यायालयात हजर केले असता दि. १४/०२/२०२६ पर्यंत FCR मंजूर करण्यात आले होते. पुढील सुनावणीदम्यान न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.
सदर कारवाई उपवसंरक्षक ब्रम्हपुरी यांचे मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव ) तसेच सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केली. विविध क्षेत्रसहायक, वनरक्षक व RRU टिमच्या कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहकार्य केले.
या प्रकरणाचा पुढील तपास वनविभागाकडून सुरू असून, वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.