▪️गडचिरोली / स्टील प्रकल्पाला तीव्र विरोध; ग्रामस्थांचा हल्ला..!!
▪️सरपंचानी बोलवलेल्या ग्रामसभेवर तीव्र विरोध..!! गावक-यांनी कंपनीला जमीन न विकण्याचा ठराव मंजुर केला..!!

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांनी मेटास्टील इन्फ्रॉस्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडच्या स्टील प्रकल्पाला तीव्र विरोध केला आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता सरपंचांनी बोलावलेल्या विशेष ग्रामसभेवर बहिष्कार टाकला. सोमवारी झालेल्या या विशेष ग्रामसभेत मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आणि त्यांनी कंपनीला जमीन देण्याच्या प्रयत्नाचा निषेध केला आणि ग्रामसभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या ग्रामसभेत ग्रामस्थांनी सरपंच, कंपनी प्रतिनिधी आणि दलालांवर जोरदार हल्ला केला.
अडपल्ली ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या विविध गावांतील शेकडो लोक या विशेष ग्रामसभेला उपस्थित होते. रविवारी 8 फेब्रुवारी संध्याकाळी सरपंचांनी गावात नोटीस लावल्याने आणि तात्काळ ग्रामसभा बोलावल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. “नोटीस लावल्यानंतर तात्काळ ग्रामसभा बोलावण्याची काय गरज होती? ग्रामस्थांना विश्वासात न घेता कंपनीला जमीन कोण देणार?” असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला.
ग्रामसभेवर बहिष्कार टाकला. महत्त्वाचे म्हणजे, 4 फेब्रुवारी रोजी झालेल्या शेवटच्या बैठकीत,
गावकऱ्यांनी कंपनीला स्पष्टपणे विरोध केला होता आणि जमीन न विकण्याचा ठराव मंजूर केला होता. तथापि, जेव्हा सरपंचांनी परस्पर नोटीस बजावली आणि नवीन ग्रामसभा बोलावली तेव्हा गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला.



