ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️जानाळा येथे मोतीबिंदू तपासणी शिबिरात १७९ रुग्णांची तपासणी..

▪️तपासणीअंती ९० रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र..

 

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मूल : (इंडिया २४ न्यूज ) :मूल तालुक्यातील जानाळा येथे राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत भव्य निशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण १७९ रुग्णांची सखोल नेत्र तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ९० रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.हे शिबिर समता फाउंडेशन, मुंबई, शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर , सक्षम फाउंडेशन तसेच सौरभ वाढई व धनराज रामटेके मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने जानाळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर बुधवार (दि. १८) रोजी पार पडले.कार्यक्रमाचे उद्घाटन मूल नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौं.एकता समर्थ यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष श्री.संतोषसिंह रावत होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषदेचे बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, नगरसेवक बंडूभाऊ गुरनुले, तालुका काँग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, माजी ग्रामपंचायत सदस्य ईश्वर वाढई, निता निकोडे,शालू कुंभरे,ताराचंद खोब्रागडे, तंटामुक्ती अध्यक्षा मंजुबाई नैताम, सुशी येथील सरपंच अनिल सोनुले,टोलवाही ग्रामपंचायत सरपंच वैशाली निकोडे, पत्रकार राजू वाढई, विनायक निकोडे, डॉ. समता लिंगायत, समता फाउंडेशन चे आकाश निकुरे आदी उपस्थित होते.शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने नागरिकांची सखोल नेत्र तपासणी केली. ११० नागरिकांची इजिसी तपासणी ईसीजी टेक्निशन विनीत लाकडे, सुरज खोब्रागडे यांनी केली.मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या ९० रुग्णांवर नागपूर येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे रुग्णांची तपासणी, नागपूर येथे ने-आण व्यवस्था, शस्त्रक्रिया तसेच राहण्याची सुविधा पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सक्षम फाउंडेशनने हा पुढाकार घेतला. याशिवाय शिबिरात मोफत सर्वसाधारण आरोग्य तपासणी, आधार कार्ड अपडेट व आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौरभ वाढई यांनी केले. संचालन शशिकांत गणवीर यांनी तर आभार प्रदर्शन धनराज रामटेके यांनी मानले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल नागरिकांनी आयोजकांचे कौतुक केले असून अशा उपक्रमांची गरज ग्रामीण भागात असल्याची भावना व्यक्त केली.शिबिराच्या यशस्वितेसाठी सुरज हजारे,प्रमोद मशाखेत्री,अर्पित आलाम,सावन वाढई ,राहुल वाकडे,अनिकेत ताकसांडें,पराग ताकसांडे,छाया आकुलवार,स्वाती आयलनवार,अस्मिता रामटेके, मेघा कुळमेथे,लक्ष्मी कुळमेथे, तुप्ती आलाम,स्वप्नील मेश्राम,विनोद सीडाम,लिलाधर गुरनुले, नितेश खोब्रागडे यांनी अथक परिश्रम घेतले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.