आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️लोकनेत्या शोभाताई फडणवीस यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून साजरा केला वाढदिवस..

▪️लोकांच्या चेहऱ्यावरील आनंदच माझेसाठी मौलाचा : माजी मंत्री शोभाताई फडणवीस

 

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : गेले अनेक वर्षे शोभाताई सोबत काम करण्याची मला संधी मिळाली, त्यांच्याकडुन मला भरपूर नविन शिकायला मिळाले, चंद्रपूर जिल्हयाचा पालकमंत्री म्हणुन काम करीत असतांना ताईनी मला अनेकदा वेगवेगळी कामे सांगीतली.परंतु स्वतःचे कोणतेही काम कधीही सांगीतली नाही, आज ८४ वर्षे पुर्ण करून ८५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत, परंतु त्या जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी थकत नाही, यामुळे त्या खऱ्या अर्थाने लोकनेत्या आहेत असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री नामदार प्रा. अशोक उईके यांनी केले. ते शोभाताई फडणवीस मित्र परिवाराच्या वतिने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी जि. सी. विनय गौडा, मूलच्या नगराध्यक्ष सौं.एकताताई समर्थ, ज्योतीताई फडणवीस, तन्मय फडणवीस उपस्थित होते.

शोभाताई फडणवीस यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, जनतेची कामे करतांना मी मन झोकुन काम करीत असते, लोकांचे कामे पुर्ण झालेले पाहुन मला आनंद मिळतो, हा आनंदच माझेसाठी खुप मौलाचा आहे, आज त्याच कामाची मला पावती मिळाळी असुन ह्या आनंददायी सोहळयात सहभागी झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी सर्वपक्षातील नेते, सामाजिक कार्यकर्ते यांनी शोभाताई फडणवीस यांची भेट घेवुन शुभेच्छा दिल्या. यावेळी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीरामध्ये ५१ रक्तदात्यानी रक्तदान केले. रक्तदान शिबीराचे उद्घाटन शोभाताई फडणवीस यांचे हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शोभाताई फडणवीस मित्र परिवाराचे पदाधिकारी, सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.