▪️हेडलाईन : गंभीर रुग्णाला चंद्रपूरहून नागपूरला सुखरूप हलविण्यात यश; अँब्युलन्स चालक व असिस्टंटचे कौतुकास्पद..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : गडचिरोली जिल्ह्यातील बोधली येथील रहिवासी देवानंद मोहुर्ले यांना अचानक प्रकृती गंभीर झाल्याने चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूतील (Cerebrum) रक्तवाहिनीत ब्लड क्लॉट झाल्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली होती आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
दरम्यान रुग्णाची प्रकृती अधिकच खालावल्याने तातडीने पुढील उपचारासाठी नागपूर येथील Neuron Hospital येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. या अतिशय गंभीर परिस्थितीत अँब्युलन्स चालक शुभम पाटील आणि अँब्युलन्स असिस्टंट दिलखुश पी. कातकर यांनी आपल्या कौशल्याने आणि तत्परतेने रुग्णाला स्थिर ठेवत सुरक्षितरित्या नागपूर येथील Neuron Hospital मध्ये पोहोचवले.
त्यांच्या या तत्पर सेवेमुळे रुग्णाला वेळेत योग्य उपचार मिळण्यास मदत झाली. याबद्दल रुग्णाच्या कुटुंबीयांनी तसेच हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी अँब्युलन्स असिस्टंट दिलखुश कटकार आणि ॲम्ब्युलन्स ड्रायवर शुभम पाटील यांचे आभार मानले.



