▪️पेट्रोल पंपवर शौचालय व बाथरूम अभावी महिलांसह वाहनधारकांची गैरसोय : विजय लाड

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : गडचिरोली जिल्ह्यात शासनाकडून मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपांना परवाने देण्यात आले आहेत. मात्र अनेक पेट्रोल पंपवर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. पेट्रोल पंपांवर शौचालय, बाथरूम तसेच फिल्टरच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा असणे अनिवार्य असतानाही अनेक ठिकाणी या सुविधा उपलब्ध नसल्याने महिलांसह प्रवासी व वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. तत्काळ सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख विजय लाड यांनी केली.
विशेषत महिला प्रवासी व नागरिकांना यामुळे मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. काही ठिकाणी शौचालय व बाथरूमची व्यवस्था असली तरी ते अत्यंत अस्वच्छ असून दुर्गंधी व घाण यामुळे त्याचा वापर करणे कठीण होत आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित पेट्रोल पंप चालकांनी स्वच्छता राखून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे तातडीने लक्ष देऊन तपासणी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी कॉंग्रेसचे सोशल मिडिया प्रमुख विजय लाड यांनी केली आहे.



