▪️विद्यार्थ्यांनी अंतिम स्तर गाठण्यासाठी उपचारात्मक अध्यापनाची गरज : केंद्रप्रमुख विनोद खोब्रागडे यांचे प्रतिपादन..

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : गाव तिथ शाळा आणि शाळा परिसरात अनेक संसाधने व सुविधा उपलब्ध झाल्या असल्या तरी बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक कमतरता भासत असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांमधून सुजान नागरिक निर्माण करण्यासाठी त्यांच्यात शैक्षणिक मुल्ये रुजवली गेली पाहिजे. निपण महाराष्ट्र अभियानामध्ये शंभर टक्के विद्यार्थ्यांनी अंतिम स्तर गाठण्यासाठी कृती आराखडा तयार करून उपचारात्मक अध्यापनाची गरज आहे असे प्रतिपादन तळोधी केंद्राचे केंद्रप्रमुख विनोद खोब्रागडे यांनी केले. तळोधी केंद्राची शिक्षण परिषद जि प. प्राथमिक शाळा रामपुर टोली येथे पार पडली त्यावेळी ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. याप्रसंगी एन इ पी २०२० ही तासिका विषय शिक्षक जाम्पलवार यांनी घेतली, पहिलीचे प्रगती कार्ड यावर शिक्षक सोनटक्के यांनी मार्गदर्शन केले. शिक्षिका मेश्राम यांनी मूल्यवर्धन तासिका घेतली. शिक्षण परिषदेमध्ये सर्व शिक्षकांनी आपला कृती आराखडा तयार करून उपचारात्मक अध्यापन कसे करतो याचे सादरीकरण केले .शिक्षण परिषद यशस्वी होण्यासाठी शिक्षक सातपुते, शिक्षिका इंगळे यांनी सहकार्य केले.


