ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️विहीरी उडी घेऊन एका तरुणाची आत्महत्या शेगाव पोलिस स्टेशन येथील घटना..

 

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर / वरोरा – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यातील शेगाव बु. येथील एका तरुणाने दारुच्या नशेत विहीरी उडी घेऊन जीवन यात्रा संपवल्याची घटना दि. १५ मार्च रविवारला सकाळी चार वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार पिंटेश रामाजी दडमल वय ३० वर्ष रा. हणूमान वार्ड शेगाव ( बू ) असे या मृतकाचे नाव आहे. पिंटेश हा नेहमी दारूच्या नशेत राहत असून तरुणाच्या परिवार तसेच मृत तरुण हा मजुरीचे काम करायचे नेहमी दारू पिण्याच्या सवयीमुळे घरामध्ये किरकोळ वाद होत असल्याने घटनेच्या दिवशी सुद्धा मृत तरुण हा दारूच्या नशेत असून घरामध्ये किरकोळ वाद करून सरळ विहिरीकडे धावत सुटला व कुठलाही विचार न करता शेगाव येथील माता मंदिर वार्डा मधील एका छोट्याशा विहिरीमध्ये उडी टाकून जीवन यात्रा संपवली अशी माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली आहे.तसेच याची माहिती शेगाव पोलिसांना देण्यात आली शेगाव पोलीस यांनी गावातील काही तरुणांच्या मदतीने सदर तरुणाचा मृतदेह विहिरी बाहेर काढला असून घटनास्थळ पंचनामा करत प्रेत उत्तरनीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठवण्यात आलेला आहे. या घटनेचा अधिक तपास शेगावचे ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय पोले व शेगाव पोलीस करीत आहे…

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.