ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️भाकपाच्या पाठपुराव्याला यश; पागल कुत्र्यांचा बंदोबस्त, गुमलाकोंडा गाव भयमुक्त..

 

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

सिरोंचा – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यातील ग्रामपंचायत गुमलाकोंडा येथे पागल कुत्र्यांचा वाढता उपद्रव हा सर्वसामान्य जनतेसाठी गंभीर प्रश्न बनला होता. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले होते. लहान मुले, महिला व वृद्ध नागरिक यांना घराबाहेर पडणेही कठीण झाले होते.

गावकऱ्यांच्या विनंतीवरून भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा) चे पदाधिकारी कॉ. सचिन मोतकुरवार (जिल्हा सहसचिव), कॉ. सुरज जककुलवार (जिल्हा सदस्य) आणि कॉ. रवी बरसांगडी (ता. सचिव, भाकपा सिरोंचा) यांनी गावाला भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी पागल कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाबाबत आपली समस्या मांडली. अनेकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना समोर आल्याने परिस्थिती चिंताजनक बनली असल्याचे त्यांनी सांगितले.

या गंभीर प्रश्नावर भाकपाच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने प्रशासनाकडे धाव घेत निवेदन सादर केले व त्वरित कारवाईची मागणी लावून धरली. भाकपाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासनाला या प्रश्नाची दखल घ्यावी लागली आणि संबंधित विभागाच्या पथकाला गावात पाठवण्यात आले.

त्यानंतर गुमलाकोंडा गावात विशेष मोहीम राबवून पागल कुत्र्यांना पकडण्यात आले. या कारवाईमुळे गावातील भीतीचे वातावरण दूर झाले असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता गावकरी भयमुक्त वातावरणात दैनंदिन जीवन जगत आहेत.

या यशस्वी कारवाईबद्दल ग्रामस्थांनी भाकपाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेऊन सातत्याने पाठपुरावा भाकपा ने केला व कारवाई करावीच लागली हे या घटनेतून पुन्हा सिद्ध झाले आहे.

दरम्यान, भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची मागणी करण्यात आली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.