▪️राजुरा मतदारसंघासाठी डोंगरी विकास योजनेअंतर्गत ८४ लाख २० हजार रुपयांचा निधी मंजूर..!
▪️आमदार देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्याला यश..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
राजुरा – ( इंडिया 24 न्युज ) : २७ राजुरा विधानसभा मतदारसंघातील डोंगरी भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२६ करीता आवश्यक निधीचे वितरण करण्यात आले असून, यामध्ये मतदारसंघातील राजुरा, कोरपना व जिवती या तालुक्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने अलिकडेच काढलेल्या शासन निर्णयानुसार राजुरा विधानसभा मतदारसंघातील डोंगरी गटात मोडणाऱ्या तिन्ही तालुक्यांसाठी एकूण ८४ लाख २० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून हा निधी ‘उपगट’ श्रेणीअंतर्गत देण्यात आला आहे.
राजुरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार देवराव भोंगळे यांनी या निधीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता; त्यांच्या प्रयत्नांमुळेच राजुरा, कोरपना व जिवती या डोंगराळ भागातील तालुक्यांसाठी हा निधी मंजूर झाला असून स्थानिक नागरिकांनी या विकास निधीबद्दल समाधान व्यक्त करीत आमदार देवराव भोंगळे यांचे आभार मानले आहेत.
डोंगरी विकास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या या निधीमुळे मतदारसंघातील रस्ते, पायाभूत सुविधा आणि पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांच्या कामांना गती मिळणार असल्याची माहिती आमदार देवराव भोंगळे यांनी दिली आहे.



