▪️हिंदटेक कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक निकृष्ट बियाण्यामुळे उत्पादनाचे नुकसान..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चामोर्शी : ( इंडिया 24 न्युज ) : मौजा भोगनबोडी, वालसरा, कुंभारवाही आणि सोनापुर परिसरातील शेतकऱ्यांनी हिंदटेक कंपनीचा “मोहरा” वाणाचा बियाणे घेऊन पेरणी केली होती. मात्र,या बियाण्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट निघाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संतप्त शेतकऱ्यांनी कंपनीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांनी सांगितले की, कंपनीने उच्च उत्पादन देणारा दर्जेदार वाण व 150ते155 दिवसात निघणार असा दावा केला होता; मात्र 90 ते 100 दिवसात धान निघाला आहे. संपूर्ण हंगाम वाया गेला.त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याची तक्रार दाखल होताच तालुका स्तरीय समितीने शेतावर जाऊन प्रत्यक्ष पीक परिस्थितीचा आधारे भेटीचा अहवाल व पंचनामा करण्यात आला. तपासात बियाणे निकृष्ट व भेसळ दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. पंचनामा करिता मा उपविभागीय कृषी अधिकारी गडचिरोली श्री. धर्मेश गिर्हेपुंजे, डॉ भूपेश नंदेश्वर शास्त्रज्ञ तथा अनुवंश व वनस्पती प्रजनक सहाय्यक प्राध्यापक कृषी महाविद्यालय गडचिरोली मा तालुका कृषी अधिकारी चामोर्शी श्री अमित तुंडम कृषी अधिकारी गुण नियंत्रण श्री. पी. पी.गजभिये,बियाणे विक्रेते तक्रारदार शेतकरी स्थानिक शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांची मागणी आहे की, तातडीने नुकसानभरपाई द्यावी आणि संबंधित हिंदटेक कंपनीवर कठोर कारवाई करावी. शासनाकडून न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.



