आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️रयत नागरी सहकारी पतसंस्था मूल संबंधित चौकशीसाठी प्रशासनाच्या विरोधात सभासदांचा आक्रोश..

▪️२० एप्रिल २०२६ पासून तक्रारकर्त्या सभासदांचा आमरण उपोषणाचा इशारा..

 

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : मूल शहरातील रयत नागरी सहकारी पतसंस्थेच्या विद्यमान अध्यक्ष व संचालक मंडळाच्या कारभाराबाबत पतसंस्थेच्या अनेक सभासदांच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असून त्यांनी संबंधित प्रशासन चंद्रपूर यांचेकडे चौकशी करण्यात यावी,याबाबत अनेकदा निवेदने सादर केली. परंतु प्रशासनाने तक्रारकर्त्या सभासदांच्या मागणीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे.
तक्रारकर्त्या सभासदांनी पतसंस्थेच्या गलथान कारभाराबाबत पुराव्यानिशी तक्रार देऊनही चौकशी अधिकाऱ्यांनी अजूनही चौकशी केली नाही. प्रशासनाच्या दिरंगाईमुळेच आम्हा तक्रारकर्त्या सभासदांना आमरण उपोषणाचा मार्ग पत्करावा लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
४ मार्च २०२६ ला गठीत झालेल्या चौकशी समितीने आपले चौकशीचे काम पूर्ण करून अहवाल योग्य वेळी सादर केला असता तर तक्रारकर्त्यां सभासदांना आमरण उपोषणाचा मार्ग पत्कारावा लागला नसता आणि व्यवहाराच्या दृष्टीने सुरळीत चाललेल्या व नावारूपास आलेल्या रयत नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेविदारांच्या मनात बँक व्यवहाराविषयी शंका येऊन भीतीचे वातावरण तयार झाले नसते. कारण ठेवदरांनी घाम गाळून पै पै रक्कम गोळा करून बँकेत बचत केलेली आहे.
तक्रारकर्त्या सभासदांनी केलेल्या तक्रारिंची सखोल चौकशी करून तक्रारकर्त्यांना योग्य न्याय मिळवून द्यावा, यासाठी दिनांक २० एप्रिल २०२६ पासून तक्रारकर्ते सभासद गांधी चौक मूल येथे आमरण उपोषणास बसणार आहेत. जोपर्यंत आम्हास योग्य न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील, असे तक्रारकर्त्या सभासदांचे म्हणणे आहे.
या गंभीर प्रकरणाकडे चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण पतसंस्थेयिक बँकिंग क्षेत्राचे लक्ष लागले असून चौकशी समिती योग्य चौकशी करणार काय? तसेच सहाय्यक निबंधक यावर काय कारवाई करतात, यावर सर्व अवलंबून आहे.
या पतसंस्थेच्या चौकशी साठी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने योग्य वेळी चौकशी करून योग्य निर्णय दिला असता तर कदाचित तक्रारकर्त्या सभासदांना आमरण उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला नसता आणि मूल शहरात नावारूपास आलेल्या रयत नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेविदारांच्या व बचतकर्त्यांच्या मनात बँक व्यवहाराविषयी निर्माण झालेली भीती दूर झाली असती,असे शहरातील जुन्या जाणत्या जानकार मान्यवरांचे, ठेविदारांचे आणि तक्रारकर्त्या सभासदांचे म्हणणे आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.