आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️पोलीस स्टेशन गडचांदुर हद्दीत मुंबई इंडियन V/s पंजाब किंग्स IPL सामन्यावर क्रिकेट सट्टा लावणारे दोघांविरुध्द कारवाई..

▪️चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा ची कामगिरी.

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर गडचांदुर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. १६/०४/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथकास गोपनिय माहितगार कडुन मिळालेल्या खात्रीशिर माहितीवरुन पोलीस स्टेशन गडचांदुर ह‌द्दीत माशाअल्लाह बिर्यानी सेंटर समोर मुंबई इंडियन V/s पंजाब किंग्स IPL सामन्यावर www.nice7777.fun या ऑनलाईन बेंटिग आय.डी. वर क्रिकेट सट्टा खेळतांना नामे जुबेर रसुल सैयद वय २२ वर्ष रा. धुमने ले-आउट गडचांदुर यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन एक २०,०००/- रु. किमतीचा मोबाईल जप्त करुन त्याचे आणि त्यास बेटींग आयडी पुरविणारा इसम नामे रोहीत काकडे रा. गडचांदुर यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन गडचांदुर येथे अपराध क्रमांक २६१/२०२६ कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनयम व सहकलम ४९ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदरची कामगिरी श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि श्री दिपक कांक्रेडवार, सपोनि श्री बलराम झाडोकार, सफौ स्वामीदास चालेकर, पोहवा अजय बागेसर, किशोर वैरागडे, पोअं. गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.