ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा..

▪️नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 19 : भारतीय हवामान विभागाकडून आगामी काळात विदर्भात, विशेष करून चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या कालावधीत काही ठिकाणी उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने उष्णतेच्या काळात नागरिकांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी खालील प्रमाणे काळजी घ्यावी.

1) तीव्र उन्हात विशेषतः दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान बाहेर पडणे टाळावे. 2) पुरेसे पाणी पित राहावे. तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पाणी पिण्याची सवय ठेवावी. 3) घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री, टोपी तसेच पांढरा शेला / दुपट्टा वापरावा. 4) सूर्यप्रकाशापासून बचावासाठीघरातील पडदे व झडपा वापराव्यात. 5) हलके, पातळ, सच्छिद्र व पांढऱ्या रंगाचे सूती / खादीचे कपडे वापरावेत. 6) प्रवास करताना किंवा कामाच्या ठिकाणी मुबलक पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.

7) शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, लिंबूपाणी, ताक, लस्सी इ. द्रवपदार्थ घ्यावेत. 8) घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. 9) घरामध्ये कुलर, पंखे किंवा वातानुकूलन (AC) यांचा योग्य वापर करावा. 10) कामगारांना सूर्यप्रकाशाचा थेट संपर्क टाळण्यासाठी सूचना द्याव्यात. 11) गरोदर महिला, वयोवृद्ध, आजारी व्यक्ती व लहान मुले यांची विशेष काळजी घ्यावी. 12) शिळे अन्न खाणे टाळावे. 13) उन्हात काम करताना चेहरा व डोके ओल्या कापडाने झाकावे. 14) शक्यतो दुपारी 12 ते 4 या कालावधीत श्रमाची कामे टाळावीत. 15) चक्कर येणे किंवा अस्वस्थ वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 16) पाळीव प्राणी व गुरेढोरे यांना सावलीत ठेवून त्यांना पुरेसे पाणी द्यावे. 17) उच्च प्रथिनयुक्त व शिळे अन्न खाणे टाळावे. 18) दुपारच्या वेळेस मद्य, चहा, कॉफी व कार्बोनेटेड शीतपेये पिणे टाळावे.

उष्माघात झालेल्या व्यक्तीस तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करावा. नागरिकांनी वरील सूचनांचे पालन करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन, चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.