▪️स्थानिक गुन्हे शाखा (LCB), चंद्रपूरची मोठी कारवाई, ८. ०१५ किलो २,१०,००० रुपयाच्या गांजासह एका आरोपी अटक..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर ( इंडिया 24 न्युज ) : जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कामगिरी केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने कुंदन प्लाझा चौक परिसरात सापळा रचून एका आंतरराज्यीय तस्कराला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून ८.०१५ किलो अवैध गांजा जप्त केला आहे.
दि. २२ एप्रिल २०२६ रोजी रात्री, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले आणि त्यांच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक व्यक्ती ओडिसा राज्यातून गांजाची मोठी खेप घेऊन चंद्रपूर शहरातील राष्ट्रवादी नगर भागात विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे कुंदन प्लाझा चौक, नागपूर रोड येथे नाकाबंदी करून सापळा रचण्यात आला. रात्री अंदाजे ०२:०० वाजताच्या सुमारास, वर्णनाप्रमाणे एक संशयास्पद व्यक्ती प्लास्टिकची पिशवी घेऊन येताना दिसली. पोलिसांनी त्याला ताव्यात घेऊन पंचांसमक्ष झडती घेतली असता. त्याच्याकडे असलेल्या पिशवीत ८.०१५ किलो वजनाचा ओला गांजा (पाने, फुले व बियांसह) आढळून आला, अटक करण्यात आलेला आरोपी, शहादेव ठाकूरदास मलिक वय ५३ वर्षे राहणारः ठाकूरनगर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली (सध्या रा. राष्ट्रवादी नगर, चंद्रपूर).जप्त करण्यात आलेला मुद्देमालः गांजाः ८.०१५ किलो (अंदाजे किंमत २,००,००० रुपये) मोबाईलः एक जुना वापरता इन्फिनिक्स (Infinix) कंपनीचा मोबाईल फोन. एकूण जप्त मुद्देमालः अंदाजे २,१०,००० रुपये. आरोपीने हा गांजा ओडिसा राज्यातून तस्करी करून आणल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे अमली औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act) १९८५ मधील कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (ড) (ii)(2) तपास पथकः अन्य काशी सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक ईश्वर वारी कातकडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, यांचे नेतृत्वात पोउपनि. विनोद भुरले, पोउपनि सुनिल काडी गौरकार, पोलीस स्टॉफ पोहवा /सुभाष गोहोकार, पोहवा/सतिश अवथरे, पोहवा / रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा/दिपक एक डोंगरे, पोहवा /इम्रान खान, पोअं/हिरालाल गुप्ता, पोअं/किशोर वाकाटे, पोअं/शशांक बदामवार, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.



