▪️अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणातील प्रस्ताविक उपवर्गीय करण्याला बहुजन जनता दलाचा विरोध. पंडितभाऊ दाभाडे

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
नंदुरबार – ( इंडिया 24 न्युज ) : दि. अनुसूचित जाती जमातीतील आरक्षणात प्रस्ताविक असलेल्या उपवर्गीयकरणाला बहुजन जनता दलाच्या वतीने आक्षेप व विरोधी करण्यात आला आहे अनुसूचित जाती जमातील ५९ जातींना विश्वासात घेण्यात आलेले नाही तसेच त्यांना कुठलेही सुनावणी वेळी बोलविण्यात आले नाही किंवा बोलण्याची संधी देखील नाकारली आहे त्यामुळे अनंत बदर समितीचा अहवाल तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी मा श्री पंडितभाऊ दाभाडे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन जनता दल यांनी केली आहे.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती दिनानिमित्त नंदुरबार येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक अण्णाभाऊ साठे रंगमंच येथे बहुजन जनता दल नंदुरबार जिल्हा शाखेच्या वतीने राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकरी प्रबोधन सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा उद्घाटन प्रसंगी मा श्री पंडितभाऊ दाभाडे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन जनता दल यांनी ही मागणी केली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट आणि राज्य अनुसूचित जाती आणि जमाती आयोग तसेच समाज कल्याण आयुक्त यांच्याशी देखील सक्षम भेटून व चर्चा करून त्यांना निवेदन देणार असल्याचेही मा श्री पंडितभाऊ दाभाडे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन जनता दल यांनी सांगितले .
त्यांनी म्हटले आहे. की एक सदस्वीय अनंत बदर समितीची स्थापना ही असविधानिक आहे तिची निर्मिती कायदेसंगत नाही या समितीमध्ये राज्य शासनाने अनुसूचित जातीतील ५९ जातींपैकी कोणत्याही जातीचा प्रतिनिधी नेमलेला नाही. अनुसूचित जातीतील आरक्षणातील उपवर्गीकरण आमचा विरोध आहे त्या माध्यमातून आरक्षण संपवण्याचे मोठे कारस्थान सुरू आहे असा आरोपही मा श्री पंडितभाऊ दाभाडे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन जनता दल यांनी केला आहे.
. अनंत बदर समितीचा अहवाल राज्यातील सामान्य नागरिका समोर सक्षम ठेवण्यात यावा आणि संबंधित अहवाल व उपवर्गीकरण या विषयावर ज्यांनी ज्यांनी विरोध व आक्षेप आणि सूचना सादर करण्यासाठी किमान एक ते दोन महिन्याचा वेळ द्यावा त्यानंतर याबाबत सुनावणी घेण्यात यावी अनुचित जातीतील प्रत्येक जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचे प्रतिनिधी अनंत बदर समितीवर नियुक्त करण्यात यावे अशीही मागणी मा श्री पंडितभाऊ दाभाडे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन जनता दल यांनी केली आहे.
संबंधित प्रतिनिधीच्या मताच्या आधारावर अनुचित जातीतील आरक्षणात उपवर्गीकरण करावे किंवा नाही याबाबत निर्णय घेण्यात यावा या मागण्यावर कारवाई न केल्यास बहुजन जनता दल राज्य शासनाच्या विरोधात राज्यात मोठे आंदोलन करणार असा इशाराही मा श्री पंडितभाऊ दाभाडे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन जनता दल यांनी दिला आहे.
यावेळी बहुजन जनता दलाचे केशव गंगणे (माजी नगरसेवक) प्रमोदीनी साखरे (माजी नगरसेवक नगरपंचायत) रोहित काळे संजय क्षीरसागर उमेश यादव (ग्रामपंचायत सदस्य) तुकाराम इंगळे केशव मेश्राम किशोर पाटील संजय इंगळे महेंद्र भिसे यांच्यासह नंदुरबार जिल्हा व शहरातील बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते असे बहुजन जनता दलाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ सोनटक्के यांनी कळविले आहे.



