आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️IPL सामन्यावर क्रिकेट सट्टा खेळणाऱ्या इसमावर कारवाई..

 

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : स्थानिक गुन्हे शाखेची IPL सामन्यावर क्रिकेट सट्टा खेळणाऱ्या इसमावर कारवाई”
दि. 22/04/2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पो.स्टे. रामनगर हद्दीतील दूध डेरी, RTO रोड, चंद्रपूर येथे लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या IPL सामन्यावर क्रिकेट सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाल्याने रेड करण्यात आली.
रेड दरम्यान आरोपी प्रणय वेकटेश चिलमलवार (वय 24 वर्षे, रा. अहेरी जि. गडचिरोली) हा www.nice7777.fun⁠� या बेटिंग आयडीवर सट्टा खेळताना मिळून आला. त्याचेकडून एक मोबाईल फोन (किंमत अंदाजे ₹25,000/-) जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी आरोपी प्रणय वेकटेश चिलमलवार (वय 24 वर्षे, रा. अहेरी जि. गडचिरोली), 2) इरफान खान, रा. अहेरी जि. गडचिरोली याने बेटिंग आयडी पुरविल्याने त्यांच्या विरुद्ध पो.स्टे. रामनगर येथे कलम 12 (A) महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम तसेच सहकलम 49 भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.