ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️ट्रकची कारला धडक, जीवितहानी टळली..

▪️चामोर्शी येथील हत्तीगेट जवळील घटना सुरजागड खनिज वाहतूक करणाऱ्या कंपनीच्या बेफिकीरपणावर प्रश्नचिन्ह..

 

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : सुरजागड येथून लोह वाहतूक करणाऱ्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या नादात कारला जोरदार धडक दिल्याची घटना चामोर्शी येथील हत्तीगेट जवळ घडली. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली खनिज वाहतूक करणाऱ्या कंपनीच्या बेफिकीरपनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून अपघातात मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कार (क्र. MH 14 GB 8998) ही कार घेऊन सहपरिवार चामोर्शीवरून गडचिरोलीकडे जात असताना हत्तीगेटजवळ पोहोचली. त्याचवेळी सुरजागड परिसरातून लोह वाहतूक करणाऱ्या ट्रकने (क्र. CG-04 PT 1651) बेदरकारपणे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कारमधील प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.या घटनेनंतर काही काळ हत्तीगेट परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली व संताप व्यक्त केला. सुरजागड खाणीतील लोह वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांकडून सातत्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.विशेष म्हणजे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात खनिज वाहतूक होत असताना संबंधित कंपनीकडून सुरक्षिततेच्या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याची तक्रार वारंवार पुढे येत आहे. वेगमर्यादा न पाळणे, धोकादायक ओव्हरटेक, तसेच शहराच्या वर्दळीच्या भागातून जड वाहने चालवणे, यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच हत्तीगेट परिसरात जड वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.