▪️अतिक्रमणाने शहरातील रस्त्यावर वाहतूक कोंडी संबधित विभागाचे दुर्लक्ष..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्यामुळे परिसरातील ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात येथे ये-जा करतात. गुरुवारी भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे शहरातील मुख्य मार्गावर रस्त्याआड दोन्ही बाजूला आधीच अतिक्रमणाने बरबटलेल्या या रस्त्यावर जड वाहने येत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये जा करावे लागत असते अशीच अवस्था तहसील कार्यालय पंचायत समिती ,व कृषी उत्पन्न बाजार समिती यासारख्या महत्त्वाच्या कार्यालयामुळे ही या भागात सतत मोठी गर्दी असते अशा गंभीर परिस्थितीतही काही दुकानदारांनी रस्त्यावर शेड साहित्य फलक बोर्ड टाकून उघडपणे अतिक्रमण केले आहे नाल्याच्या बाहेर पर्यंत सामान मांडल्यामुळे रस्ता पूर्णपणे अरुंद झाला असून पादचारी विद्यार्थी ,महिला आणि रुग्णवाहिका यांना जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागत आहे प्रशासन मात्र या सर्व प्रकाराकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे विशेषता गुरुवारी आठवडी बाजाराच्या दिवशी या मार्गावर जड वाहनांची वाहतूक सुरूच असल्यामुळे परिस्थिती अधिकच भयावह बनत आहे त्यामुळे गुरुवारी या मार्गावर जड वाहनांना तात्काळ बंदी घालावी अन्यथा उद्भवणाऱ्या कोणत्याही अपघातात प्रशासनच पूर्णता जबाबदार राहील तसेच शहरातील सर्व अतिक्रमण तात्काळ हटवून सुरळीत करण्यासाठी त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा येत्या काही दिवसात नागरिकांच्या सुरक्षेसाठी तीव्र आंदोलन रस्ता रोको आणि प्रशासकीय कार्यालयावर घेराव घालण्यात येईल असा स्पष्ट इशारा काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख विजय लाड यांनी दिला आहे.



