▪️पुन्हा अतिक्रमणावर नगर परिषद नागभीडची कारवाई, अवैध अतिक्रमण वनवास संपेल का?
▪️नियमबाह्य अवैध अतिक्रमण "जैसे थे" की कारवाईचा दिखावा जनतेचा प्रश्न?

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
नागभीड – ( इंडिया 24 न्युज ) : नगर परिषद नागभीड तर्फे शहरातील अतिक्रमणाविरोधात पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात करण्यात आली असून बाजार रस्ता व राम मंदिर चौक परिसरात संयुक्त पथकांद्वारे मोहीम राबविण्यात आली.
नगर अभियंता साई कोंडलेकर तसेच नगररचना सहायक अश्विनी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथकांनी ही कारवाई केली. बाजार रस्त्यावर दुकानांचे साहित्य बाहेर ठेवणारे तसेच राम मंदिर चौक परिसरात फुटपाथ व रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फळ व भाजी विक्रेत्यांना हटविण्यात आले.
यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या सार्वजनिक सूचनेनुसार, नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी १४ एप्रिलपर्यंत स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढण्याचे आवाहन करण्यात आले होते. फेरीवाल्यांना व्यवसाय करायचा असेल तर बाजारात शेड आणि ओटे बांधलेले आहेत तिथे व्यवसाय करावा आणि हातगाडी लावली तर रहिवासी भागात फिरून व्यवसाय करावा. अन्यथा नगर परिषदेकडून थेट कारवाई करून अतिक्रमण हटविण्यात येईल व त्यावेळी होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी संबंधितांवर राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, यापूर्वीही अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली होती. मात्र निवडणूक प्रक्रिया तसेच मार्च अखेरपर्यंत महसूल वसुलीच्या कामामुळे कारवाईत सातत्य राहू शकले नाही. आता पुन्हा नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम सुरू करण्यात आली आहे.
▪️अवैध अतिक्रमण वनवास संपेल का?
शहरात वाहतूक कोंडी ठरतेय जनतेची डोकेदुखी रस्त्यावर म्हणजेच पाव भाग दुकाने थाटतात त्यामुळे नागरिकांना वाहतूकीसाठी नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. चक्क नालीवर अवैध अतिक्रमण करून बांधकाम केले असून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर होत नाही ना अशी चर्चा सुरू आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी निकष काय आहेत? या बाबत जनता अनभिज्ञ असून काही अतिक्रमण धारकांना संरक्षण तर दिले जाणार नाही ना अशीही चर्चा सर्वत्र सुरू आहे. समता कॉलनी नागभिड येथील अतिक्रमण बाबत निवेदन देण्यात आले असून काय कारवाही होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्याधिकारी सोनम देशमुख यांनी सांगितले की,
“शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व सार्वजनिक जागा मोकळी ठेवण्यासाठी ही कारवाई पुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सामान जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल.



