आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️लॉयड्सस मेटलच्या प्रदूषणामुळे घुग्घुसचा श्वास गुदमरला; विस्तारीकरणाला स्थानिकांचा तीव्र विरोध..

▪️लॉयडस मेटल कंपनीला व गुप्ता पॉवर प्लांट गावांचा बाहेर करा किंवा घुग्घुस शहरांचे दुसरीकडे पुनर्वसन..

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : ​घुग्घुसवासियांच्या आरोग्यासाठी ‘महात्मा फुले सामाजिक संस्थे’कडे धाव; सुरेश पाईकराव यांनी दिले निवेदन
​घुग्घुस (प्रतिनिधी):
येथील ‘लॉयडस मेटल अँड एनर्जी लिमिटेड’ या कंपनीतून होणाऱ्या अतोनात प्रदूषणामुळे घुग्घुस शहराचे अस्तित्व धोक्यात आले असून, सुमारे ६० हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या जीवघेण्या प्रदूषणाविरोधात आणि कंपनीच्या प्रस्तावित विस्तारीकरणाला विरोध करण्यासाठी स्थानिक जागरूक नागरिक श्री. सुरेश मल्हारी पाईकराव यांनी महात्मा फुले सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती निताताई रमाकांत होले यांना नुकतेच एक सविस्तर निवेदन सादर केले.
​आरोग्य संकटात, हवेत लोहकणांचा थर
निवेदनात नमूद केल्यानुसार, लॉयड्स मेटल कंपनीच्या प्रक्रियेतून बाहेर पडणारी सूक्ष्म धूळ आणि लोहकण थेट नागरिकांच्या फुफ्फुसात जात आहेत. यामुळे शहरात दमा (Asthma), क्षयरोग (TB), कर्करोग (Cancer) आणि त्वचारोगांचे प्रमाण चिंताजनक रितीने वाढले आहे. दोन दिवसांच्या घुग्घुस दौऱ्यावर असताना श्रीमती निताताई होले यांनी स्वतः येथील खालावलेल्या हवेच्या गुणवत्तेचा अनुभव घेतल्याचेही पाईकराव यांनी निवेदनात म्हटले आहे.
​विस्तारीकरण म्हणजे मृत्यूचा सापळा?
सध्या कंपनीत ५०० क्षमतेचे एक आणि १०० क्षमतेचे चार किल्न सुरू आहेत. आता कंपनी कच्च्या मालापासून थेट पक्के लोखंड तयार करण्यासाठी विस्तारीकरण करण्याच्या तयारीत आहे. जर हे विस्तारीकरण झाले, तर प्रदूषणाची पातळी कित्येक पटीने वाढून घुग्घुस शहर राहण्यायोग्य उरणार नाही, अशी भीती निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
​प्रमुख मागण्या :- कंपनीच्या उत्सर्जनावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे त्वरित नियंत्रण मिळवावे.
▪️पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपनीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.▪️बाधित नागरिकांसाठी कंपनीने कायमस्वरूपी सुसज्ज आरोग्य केंद्र उभारावे.▪️हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी शहरात ठिकठिकाणी स्वतंत्र ‘एअर क्वालिटी मॉनिटर्स’ बसवावेत.
▪️सध्याचे प्रदूषण शून्य स्तरावर येईपर्यंत विस्तारीकरणाला परवानगी देऊ नये.
​”स्वच्छ हवा हा आमचा मूलभूत अधिकार आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येथील नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त होईल. महात्मा फुले सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनाकडे या विषयाचा पाठपुरावा करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा,” अशी आर्त साद सुरेश पाईकराव यांनी घातली आहे.
​या निवेदनाची दखल घेऊन आता सामाजिक संस्था आणि प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.