आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️”थेट फोन नकोच”! वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महावितरणचे ग्राहकांना कळकळीचे आवाहन..

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर/गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 21 एप्रिल 2026: रात्रीची वेळ असो वा भरदुपार, अचानक वीजपुरवठा खंडित झाला की आपण तातडीने ओळखीच्या वीज कर्मचाऱ्याचा किंवा वायरमनचा वैयक्तिक नंबर शोधून त्याला फोन लावतो. मात्र, तुमचा हा एक फोन दुरुस्तीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतू शकतो. ही बाब लक्षात घेऊन महावितरणने ग्राहकांना थेट फोन न करण्याचे कळकळीचे आवाहन केले असून तक्रार नोंदणीसाठी उपलब्ध असलेल्या अधिकृत पर्यायांचा वापर करण्याचे सुचवले आहे.
सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य: दुरुस्तीचे काम सुरू असताना कर्मचाऱ्याचे पूर्ण लक्ष तांत्रिक बाबींकडे असणे आवश्यक असते. अशावेळी ग्राहकाचा फोन आल्यास त्यांचे लक्ष विचलित होऊन भीषण अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकदा कर्मचारी कामात व्यस्त असल्याने फोन उचलू शकत नाहीत, ज्यामुळे ग्राहकांचा रोष वाढतो. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि कामातील एकाग्रता कायम राखण्यासाठी कॉल सेंटर किंवा मोबाईल ॲपचा वापर करणे हिताचे आहे.वीजपुरवठाखंडितझाल्यानंतर 10 ते 15 मिनिटेवाटबघितल्यानंतरआपलीतक्रारमहावितरणकडेनोंदवा.
आता ‘व्हॉट्सअॅप’वरही सेवा उपलब्ध: महावितरणने आपल्या सेवा अधिक सुलभ करत ‘व्हॉट्सअॅप’वर तक्रार नोंदवण्याची सोय केली आहे. ग्राहकांनी9167777721या क्रमांकावर ‘Hi’ असा संदेश पाठवून आपली भाषा निवडल्यास त्यांना वीजबिल पाहणे, भरणे किंवा तक्रार नोंदवणे यांसारख्या सुविधा मिळतील. अधिकृत खात्याची खात्री करण्यासाठी कंपनीच्या नावापुढील ‘ब्ल्यू टीक’ तपासावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
24 तास टोल-फ्री सेवा आणि मोबाईल ॲप:ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महावितरणचे18002-333-435. 18002-123-435आणि1912हे टोल-फ्री क्रमांक 24 तास कार्यरत आहेत. याशिवाय, ‘महावितरण’ मोबाईल ॲपच्या माध्यमातून एकाच वेळी अनेक वीज जोडण्यांचे व्यवस्थापन करणे शक्य झाले आहे. या अधिकृत प्रणालीमुळे तक्रारीची नोंद होऊन ती तातडीने संबंधित विभागाकडे पोहोचते आणि वीजपुरवठा जलद गतीने पूर्ववत होण्यास मदत होते.
एसएमएस आणि मिस कॉलची सुविधा: ज्या ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे, त्यांना केवळ एक मिस कॉल देऊन तक्रार नोंदवता येईल. त्यासाठी 022-50897100 हा क्रमांक उपलब्ध आहे. तसेच, 9930399303 या क्रमांकावर ‘NOPOWER [ग्राहक क्रमांक]’ असा एसएमएस पाठवूनही तक्रार नोंदवता येते.

महावितरणने आपल्या बहुतांश सेवा आता ऑनलाइन केल्या असून www.mahadiscom.in या संकेतस्थळावरही अनेक सुविधा उपलब्ध आहेत. एक जबाबदार नागरिक म्हणून अत्याधुनिक पर्यायांचा वापर करून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणनेकेलेआहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.