आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️“ताडोबा प्रकल्पातील अनुपस्थितीवरून खळबळ; तक्रार थेट वनमंत्र्यांपर्यंत”..

 

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 26 फेब्रुवारी 2026 — ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प येथील वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीचा आरोप झाल्यानंतर प्रकरण राज्य पातळीवर पोहोचले आहे.
We Care Foundation, Chandrapur चे अध्यक्ष हिमायूँ अली यांनी 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:30 वाजता कार्यालयात एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचा आरोप केला होता. या घटनेची व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचा दावा देखील करण्यात आला आहे।
दि. 26 फेब्रुवारी रोजी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले व कारवाईची मागणी केली. तसेच जिल्हा प्रशासनामार्फत महाराष्ट्राचे वनमंत्री – गणेश नाईक, प्रधान सचिव (महसूल व वन विभाग) आणि प्रधान मुख्य वन संरक्षक (PCCF) – वन्यजीव (wildlife), महाराष्ट्र यांच्याकडेही तक्रार पाठविण्यात आली आहे।
निवेदन देताना संस्थेचे उपाध्यक्ष- सुयोग भोयर, सचिव- प्रफुल्ल जैनेकर, सह सचिव -ॲड. अलनवाज तसेच सदस्य हाजी अली, चिराग नथवानी व चंद्रकिशोर यादव उपस्थित होते।

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.