आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️भारतीय राष्ट्रीय मजदूर काॅंग्रेस (महासंघ) इंटकचे वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..

▪️गॅस सिलिंडर वितरण मुद्द्यावर दत्तात्रय समर्थ जिल्हाध्यक्ष यांनी वेधले लक्ष!..

 

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : मूल नगरीतील शेकडो नागरिकांच्या एचपी गॅस वितरण व्यवस्थेतील अनियमिता व होणाऱ्या त्रासाबाबत भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (महासंघ) इंटकचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांच्या कडे तोंडी व लेखी तक्रारी आल्यानंतर त्यांनी आज शुक्रवार दि.२४ एप्रिलला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या कडे उपरोक्त विषयांकित बाबत लेखी निवेदन दिले.
दरम्यान गॅस वितरण व्यवस्थेतील अनियमितता बाबत…
नागरिकांना त्रास कसा सहन करावा लागत आहे याबाबतीत अनेक मुद्दे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले असल्याचे समर्थ यांनी या प्रतिनिधीशी आज चंद्रपूर मुक्कामी बोलताना सांगितले.
संबंधित गॅस एजन्सीला निर्देश देवून बुकिंगप्रमाणे गॅस सिलिंडरचे नियमित व वेळेवर घरपोच वितरण करण्यात यावे. तसेच ओटीपी/डिलिव्हरी संदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबतची एकमुखी मागणी दत्तात्रय समर्थ यांनी केली आहे.
मूलच्या तहसिलदार मृदूला मोरे यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष पुरवावे अशी अपेक्षा मुलवासीयांनी व्यक्त केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करताना भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस( महासंघ) इंटकचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ,जिल्हा उपाध्यक्ष चेतन कामडे ,प्रफुल वज्जलवार,सतीश सुंकरवार, अरविंद सोनटक्के,यश संगमवार,अर्पित रामगिरीवार, नितेश येनप्रेडीवार या शिवाय महासंघाचे इतर सदस्य उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.