आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️स्थानिक गुन्हे शाखा (LCB) चंद्रपूरची मोठी कारवाई तेलंगणाकडे जाणारा ३० गोवंशाचा ट्रक जप्त एक आरोपी अटक..

▪️२६.४० लाखांचा मुद्देमाल जप्त..

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दिनांकः २५ एप्रिल २०२६ चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवैध गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई केली आहे. पडोली मार्गे तेलंगणाकडे क्रूरपणे वाहतूक केल्या जाणाऱ्या ३० गोवंशाची सुटका करण्यात आली असून, याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले व त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, एका आयशर ट्रकमधून गोवंशाची कत्तल करण्याच्या उद्देशाने तेलंगणाकडे अवैध वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी पहाटे १:०० वाजेच्या सुमारास पडोली रोडवरील राहुल ढाब्यासमोर सापळा रचून आयशर ट्रक (क्र. MH 34 Z1158) अडवण्यात आला. ट्रकची पाहणी केली असता, त्यामध्ये १७ गायी आणि १३ बैल (एकूण ३० गोवंश) अत्यंत निर्दयपणे कोंबलेले आढळले. प्राण्यांचे हात, पाय आणि तोंड दोरीने घट्ट बांधलेले होते. त्यांच्यासाठी चारा किंवा पाण्याची कोणतीही सोय नव्हती. वाहन चालकाकडे प्राण्यांच्या वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा पशुवैद्यकीय दाखला मिळून आला नाही. हे प्राणी कोरची (गडचिरोली) येथून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

जप्त केलेला मुद्देमाल (एकूण किंमतः २६,४०,००० रुपये), लाल रंगाचा आयशर ट्रक (किंमत २०,००,००० रुपये), गोवंशः ३० नग गायी व बैल (किंमत ६,००,००० रुपये), मोबाईलः दोन महागडे मोबाईल संच (किंमत ४०,००० रुपये), आरोपींची निमामुद्दीन अमीनउद्दीन (वय ३८), रा. मूर्तिजापूर, अकोला (चालक अटक). मो. इरफान शेख हन्नान (वय २८), रा. मूर्तिजापूर, अकोला (अटक), मोबीन शेख, रा. गडचांदूर, चंद्रपुर (माल भरून देणारा – फरार) या प्रकरणी रामनगर पोलीस स्टेशन येथे खालील कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०: कलम ११ (१) (घ, ड, च, ज), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित २०१५): कलम ५ (अ), ५ (ब), ९.,भारतीय न्याय संहिता (BNS): कलम ३ (५), ४९.

सुटका केलेल्या सर्व गोवंशांना सुरक्षिततेसाठी ‘प्यार फाऊंडेशन’, चंद्रपूर येथे वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, यांचे नेतृत्वात पोउपनि. विनोद भुरले, पोउपनि सुनिल गौरकार, पोलीस स्टॉफ पोहवा/सुभाष गोहोकार, पोहवा/सतिश अवथरे, पोहवा/रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा/दिपक डोंगरे, पोहवा /इम्रान खान, पोअं/हिरालाल गुप्ता, पोअं/किशोर वाकाटे, पोअं/शशांक बदामवार, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.