ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार वितरण..

मुख्य संपादक तथा संचालक श्री. तुळशीराम जांभुळकर

परभणी – ( इंडिया 24 न्युज ) : जनसहयोग सेवाभावी संस्था परभणीच्या वतीने महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार वितरण,अग्रेसर सामाजिक सेवाव्रती,कलाकार आणि विद्यार्थ्याचा सत्कार समारंभात उद्घाटक आणि सत्कार मुर्ती म्हणून माझी उपस्थिती..! परभणी सह सर्व सन्मान आमचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ पदाधिकारी , सभासद,सर्व पत्रकार बंधू,सामाजिक स्नेही मित्रांना कृतज्ञतापूर्वक विनम्रपणे समर्पित…! यशाच्या वाटचालीचे हेच सारे खरे शिल्पकार…! यावेळी राष्ट्रीय पदाधिकारी मा.पुष्पराज गावंडे,अंबादास तल्हार,प्रा.विजय काटे,मनोहर मोहोड यांनाही सन्मानित करण्यात आले.

अनेक वर्षापासूनच्या विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करणारे जनसहयोग संस्थेचे अध्यक्ष प्रिय महेमुद खान,शेख सरफराज,तथा मोईन खान व सर्व सहकाऱ्यांना स्नेहपूर्वक धन्यवाद!

याप्रसंगी परभणीचे युवा महापौर,सय्यद इक्बाल व माझा जनसहयोग संस्थेच्या वतीने नागरी सत्कार.या कार्यक्रमाला मा‌.महापौरा़ंसह माजी राज्यमंत्री मा.फौजिया खान,ज्येष्ठ विधी तज्ञ अॕड.मा.अशोक सोनी, राष्ट्र निर्माण रत्न प्रबोधनकार मा‌.आर डी.मगर,आमचे परम मित्र,परभणीतील समाजसेवी,अली मदत केंद्राचे अध्यक्ष, कॉन्ट्रॅक्टर मा.सैय्यद गौस,क्राईम ईन्व्हेस्टीगेशन ब्युरो संचालिका तेलंगणाच्या मा.फराह नाज अंजुम,पोलिस उपनिरीक्षक मा.वल्लभ धोत्रे,मा. बशीर अहमद,मा‌.शेख शरीफ यांची प्रमुख उपस्थिती होती.
या परभणी दौऱ्यामध्ये पदाधिकारी सर्वश्री भगिरथजी बद्दर,देवानंद वाकळे,वाजेद पठाण,कलिम कुरेशी,दिलीप बनकर,प्रमोद अंभोरे,दिलीप बोरूड,नुरूद्दीन जावेद सिद्दीकी,अब्दुल कलिम,युनुसभाई व अनेक पदाधिकारी व सभासद सोबत उपस्थित होते.वाजेद खान पठाण यांची नेहमीप्रमाणे विशेष सहयोग व शेवटपर्यंत उपस्थिती होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.