◼️ रेल्वे धडकेत वाघिणीचा मृत्यू

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही:( इंडीया २४ न्यूज)
चंद्रपूर – गोंदिया रेल्वे मार्गावर गुरुवारी पहाटे रेल्वेच्या धडकेत एका वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना रेल्वे पिल्लर क्रमांक ११८१/८ ते ११८१/९ दरम्यान घडली संबंधित माहिती मिळतात सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
वन विभागाच्या तपासणीत मृत्त वाघीण अंदाजे २ ते ३ वर्षाची असल्याचे निष्पन्न झाले. तिचे सर्व अवयव शाबूत असल्याने शिकारीचा संशय नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. एन टी सी ए प्रतिनिधी वनअधिकारी तसेच स्वंयसेवी संस्थाच्या उपस्थितीत पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
मृत वाघीणीचे शव मध्यवर्ती कास्ट भांडार सिंदेवाही येथे आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले असून, पुढील तपासणीसाठी आवश्यक नमुने जप्त करण्यात आले आहेत. प्राथमिक निष्कर्षानुसार वाघिणीचा मृत्यू रेल्वे अपघातामुळे झाल्याचे स्पष्ट झाले.
सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृत वाघिणीचे अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास ब्रह्मपुरी वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


