ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️सिरोंच्यात आशा सेविकांच्या कोरोना काळातील थकीत मानधनासाठी निवेदन..

 

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

सिरोंचा – ( इंडिया 24 न्युज ) : दि. १ जून : सिरोंचा तालुक्यातील आशा सेविकांनी कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून गावोगावी जनजागृती, सर्वेक्षण, तपासणी, लसीकरण मोहिमा तसेच रुग्ण सेवा यांसारखी महत्त्वाची कामे प्रामाणिकपणे पार पाडली. मात्र अनेक आशा सेविकांना अद्यापही त्या काळातील प्रोत्साहनपर मानधन व थकीत रक्कम पूर्णपणे मिळालेली नसल्याची बाब समोर आली आहे.

या संदर्भात तालुका सचिव रवि बरसागंडी यांच्या नेतृत्वाखाली गट विकास अधीकारी सिरोंचा यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात कोरोना काळातील थकीत मानधन तात्काळ मंजूर करून संबंधित विभागाला आवश्यक सूचना देण्याची मागणी करण्यात आली आहे.

आशा सेविकांवर आर्थिक अडचणींचा मोठा भार पडत असून त्यांच्या योगदानाचा योग्य सन्मान व्हावा, अशी मागणी करण्यात आली. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा पुढील आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.