आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️भद्रावती ह‌द्दीत : अमली पदार्थ वाहतुक करणारे नागपूर येथील तस्कर १४,११,०००/- रु. चा माल मुद्द्यासह अटक..

▪️स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची मोठी कामगिरी एकुण 168.94 ग्रॅम एम.डी. (Mephedrone Drug) ड्रग्ज पावडर जप्त..

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दिनांक ०२ जुन, २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथकास गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, अब्दुल सिराज अब्दुल गफ्फार, रा. नागपूर हा आपल्या पांढऱ्या रंगाच्या होंडा अॅमेझ कार क्रमांक एम.एच.४९-एफ-१५६९ मधुन नागपूर येथुन भद्रावती येथे मोठया प्रमाणात प्रतिबंधीत एम.डी. (Mephedrone Drug) ड्रग्ज पावडर विक्री करीता घेवुन येणार आहे. सदर माहिती तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांना देण्यात आली व त्यांच्या नेतृत्वाखाली नागपूर- भद्रावती रोडवरील जमघट हॉटेल समोर सापळा रचुन दिनांक ०३/०६/२०२६ चे ००:३५ वाजताच्या सुमारास मिळालेल्या बातमीतील वर्णनाची पांढऱ्या रंगाची कार समोरुन येत असतांना पाहुन नाकाबंदी करुन सदर वाहनास थांबवून त्याची कायदेशीर झडती घेतली असता सदर वाहनाचा चालक नामे अब्दुल सिराज अब्दुल गफ्फार वय ४० वर्ष रा. तुकडोजी चौक नागपूर याचे ताब्यातून एकुण 168.94 ग्रॅम (Mephedrone Drug) ड्रग्ज पावडर किं.अं.८,५०,०००/- रु. वाहतुकीकरीता वापरलेले वाहन होंडा अॅमेझ कार क्रमांक एम.एच.४९-एफ-१५६९ असा एकुण १४,११,०००/-रुपयाचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस स्टेशन भद्रावती येथे आरोपीविरुध्द कलम ८(c), २२(c), २९ NDPS Act अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा चंदपूर यांचे नेतृत्वात पोउपनि श्री विनोद भुरले, पोउपनि श्री सुनिल गौरकार, पोहवा / सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दिपक डोंगरे, इमरान खान, हिरालाल गुप्ता, पोअं/किशोर वाकाटे, पोअं/शशांक बदामवार सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.