आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चंद्रपूर शहर हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: बाबूपेठ परिसरात जुगार अड्ड्यावर छापा, १० आरोपी अटक..!

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : मा. पोलीस अधीक्षक साहेब, चंद्रपूर व मा. अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांनी चंद्रपूर शहरात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम व जुगार रेडचे आदेश निर्गमित केले आहेत. सदर आदेशाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा (LCB), चंद्रपूर चे पथक चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग व मटका जुगार धंद्यांची माहिती काढत असताना, मुखबिर (गोपनीय बातमीदार) द्वारे खात्रीशीर माहिती मिळाली की, आंबेडकर चौक, बाबुपेठ वार्ड, चंद्रपूर येथील रहिवासी गुनवंत सोमाजी आवळे हा आपल्या राहत्या घरी काही इसमांना गोळा करून पैशाची बाजी लावून ‘तीन पत्ती’ नावाचा हार-जितीचा जुगार खेळत व खेळवत आहे.

सदर माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे साहेब यांना सदरची माहिती देऊन व मार्गदर्शन घेऊन त्यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, चंद्रपूर लेखी परवानगी घेऊन पंचांना पाचारण केले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करत आंबेडकर चौक, बा6yपेठ येथील संशयित घरावर अचानक छापा (Raid) टाकला. सदर छाप्यादरम्यान घराच्या पहिल्या खोलीत काही इसम गोलाकार बसून ५२ तास पत्त्यांवर पैशाची बाजी लावून जुगार खेळताना रंगेहात मिळून आले. पथकाने घटनास्थळावरून एकूण १० आरोपींना ताब्यात घेतले आहे.

निष्पन्न व अटक करण्यात आलेले आरोपी:

१) गुनवंत सोमाजी आवळे (वय ३५ वर्ष, रा. बाबुपेठ, चंद्रपूर), २) रॉयल शैलेंद्र पाटीला (वय २७ वर्ष, रा. बाबुपेठ), ३) सचिन प्रल्हाद गोवर्धन (वय ३५ वर्ष, रा. बाबुपेठ), ४) अतुल धनराज ढोक (वय ३६ वर्ष, रा. बाबुपेठ), ५) शामराव प्रल्हाद पिपरे (वय ५२ वर्ष, रा. बाबुपेठ), ६) सचिन मिलींद मानकर (वय ४० वर्ष, रा. बाबुपेठ), ७) प्रफुल ज्ञानबा भागवत (वय ३५ वर्ष, रा. बाबुपेठ), ८) सुधीर हिरालाल जांभुळकर (वय ३४ वर्ष, रा. बाबुपेठ), ९) ब्रम्हेदेव मोहन गोरी (वय ५४ वर्ष, रा. बाबुपेठ), १०) अविनाश संजय वासेकर (वय ३० वर्ष, रा. लालपेठ कॉलरी, चंद्रपूर).

सदर प्रकरणी सर्व १० आरोपींविरुद्ध चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे कलम ४, ५ मुंबई जुगार कायदा (महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा) अन्वये कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व आरोपींना पुढील तपासा करिता पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर यांच्या तब्येत देण्यात आली.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. आयुष नोपानी साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, यांच मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर श्री अमोल काचोरे, यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकर, पोलीस स्टॉफ पोहवा / सुभाष गोहोकार, पोहवा / सतिश अवथरे, पोहवा । रजनिकांत पुट्ठावार, पोहवा / दिपक डोंगरे, पोहवा / इमान खान, पोअं हिरालाल गुप्ता, पोअं / किशोर वाकाटे, पोअं/ शशांक बदामवार, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.