आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने सामुहिक वृक्षारोपण. जि. प. प्राथ, शाळा परिसर, गोंडपिपरी : आमदार देवराव दादा भोंगळे

 

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

गोंडपिपरी – ( इंडिया 24 न्युज ) : आज जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आणि भाजपच्या ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानात सहभागी होत गोंडपिपरी शहरातील जि.प. प्राथमिक शाळा व आठवडी बाजार परिसरात सामूहिक वृक्षारोपण केले.
दिवसागणिक बदलत्या हवामानाचा आणि आपल्या जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा विचार करता, पर्यावरणाचा समतोल टिकवून ठेवण्यासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी केवळ वृक्षारोपण करून थांबायचे नाही, तर लावलेल्या प्रत्येक रोपट्याचे रक्षण व संवर्धन करण्याचा संकल्प सर्व उपस्थितांनी करावा, असे आवाहन केले.

यावेळी माझ्यासोबत तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, माजी जि.प. सदस्य अमर बोडलावार, शहराध्यक्ष चेतन गौर, नगराध्यक्षा अश्विनी तोडासे, मुख्याधिकारी विवेक चौधरी, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष राकेश पून, सौ. स्वाती वडपल्लीवार, ॲड. अरुणा जांभूळकर, सारिका मडावी, बबन निकोडे, भानेश येग्गेवार, प्रवीण धोडरे, शिथिल लोणारे, वैभव बोनगीरवार,सुरेखा श्रीकोंडावार, शारदा गरपल्लीवार, मनीषा मडावी, सचिन चिंतावार, रिंकू देवगडे, जनार्दन ढुमणे, अतुल ढुमणे, अनिल काबेवार, अनिल झाडे, परशुराम गेडाम, यांचेसह भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.