ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️भाकपा व आयटकच्या पाठपुराव्यामुळे आशा वर्करांच्या मागण्यांना मान्यता; भत्ता अदा करण्याचे लेखी आदेश..

 

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधि उज्वल देवगन

सिरोंचा – ( इंडिया 24 न्युज ) : : कोरोना महामारीच्या काळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आशा वर्करांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत अखेर सकारात्मक घडामोड झाली आहे. सिरोंचा तालुक्यात ११ जून २०२६ रोजी प्रस्तावित धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबंधित मागण्यांची दखल घेत कार्यवाही सुरू केली असून आशा सेविकांच्या थकीत कोरोना प्रोत्साहन भत्त्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

या संदर्भात दिनांक ०४ जून २०२६ रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती सिरोंचा यांना निवेदन सादर करण्यात आले होते. भाकपा जिल्हा सहसचिव तथा आयटक अहेरी विधानसभा अध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. त्यांच्या सोबत भाकपा जिल्हा सदस्य कॉ. सुरज जककुलवार, भाकपा तालुका सचिव सिरोंचा कॉ. रवी बारसांगडी तसेच तालुक्यातील सर्व आशा वर्कर उपस्थित होत्या.

निवेदनात कोरोना काळात कार्यरत असलेल्या आशा वर्करांना शासन निर्णयानुसार देय असलेला प्रोत्साहन भत्ता तातडीने अदा करण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकारी, पंचायत समिती सिरोंचा यांनी लेखी आदेश जारी करत सिरोंचा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना पात्र आशा सेविकांना कोरोना प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात यावा तसेच ७ दिवसांच्या आत त्याचे अहवाल पंचायत समितीकडे सादर करावेत, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

कोरोना महामारीच्या काळात आशा वर्करांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करत गावागावात सर्वेक्षण, रुग्ण शोध, लसीकरण, जनजागृती, क्वारंटाईन व्यवस्थापन यांसारख्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. संसर्गाचा धोका पत्करून त्यांनी आरोग्य यंत्रणेचा कणा म्हणून काम केले. शासन निर्णयानुसार त्यांना प्रतिमहिना १००० रुपये प्रमाणे २८ महिन्यांचा कोरोना प्रोत्साहन भत्ता देणे अपेक्षित होते; मात्र हा भत्ता दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने आशा वर्करांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.

११ जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे परिस्थितीत सकारात्मक बदल झाला असून आशा वर्करांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कॉ. सचिन मोतकुरवार यांची प्रतिक्रिया :
“आशा वर्करांच्या मागण्यांकडे प्रशासनाने सकारात्मक दृष्टीने पाहत निर्णय घेतला, ही स्वागतार्ह बाब आहे. या प्रक्रियेत पंचायत समिती प्रशासनासोबतच सिरोंचा पोलीस प्रशासनाचेही सहकार्य लाभले. आता दिलेल्या आदेशांची वेळेत व प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.”

या निर्णयामुळे आशा वर्करांच्या प्रश्नांचा मार्ग सुकर होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. भाकपा व आयटकच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia