आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️ट्रॅक्टर धारक शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी..

▪️तहसीलदार यांना ट्रॅक्टर धारक शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन..

 

आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी आवश्यक डिझेल विनाअडथळा उपलब्ध करून देण्यात यावे तसेच पेट्रोलपंपांमार्फत होत असलेली शेतकऱ्यांची अडवणूक तात्काळ थांबवावी, या मागणीसाठी ग्राम पंचायत सदस्य तथा माजी शिवसेना मूल तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांच्या नेतृत्वात मैत्री ग्रुपचे सदस्य,सरपंच, ग्रामपंचायत सदस्य शेतकऱ्यांसह नागरिकांनी तहसीलदार मृदुला मोरे यांना निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या खरीप हंगामाची सुरुवात झाली असून शेतकरी मोठ्या प्रमाणात नांगरणी, वखरणी, पेरणी व इतर शेतीकामांसाठी ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत.मात्र तालुक्यातील अनेक पेट्रोलपंप चालकांकडून डिझेलचा तुटवडा असल्याचे कारण सांगून शेतकऱ्यांना डिझेल देण्यास नकार दिला जात आहेकिंवा जेथे डिझेल उपलब्ध असेल तिथे फक्त दोन हजार रुपयाचे मर्यादेत डिझेल दिला जातो. त्यासाठी आधार कार्ड, सातबारा, आरसी बुक आणि फार्मर आयडी सादर करणे व ट्रॅक्टर प्रत्यक्ष पेट्रोलपंपावर आणणे अशा विविध अटी घालून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

यामुळे शेतीची कामे खोळंबत असून शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनकर्त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. शासन व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यात डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात असताना स्थानिक स्तरावर निर्माण झालेल्या या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी तालुक्यातील सर्व पेट्रोलपंपांची तपासणी करून डिझेल साठ्याची पडताळणी करणे, शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी आवश्यक डिझेल विनाअडथळा उपलब्ध करून देणे, अनावश्यक अटींची वैधता तपासणे, कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या अथवा डिझेल देण्यास नकार देणाऱ्या पेट्रोलपंप चालकांवर कारवाई करणे तसेच शेती हंगामात डिझेलचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी विशेष नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करणे, तालुक्यातील सर्वच पेट्रोल पंपावर मुबलक प्रमाणात डिझेल उपलब्ध करून देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदन स्वीकारल्यानंतर तहसीलदार मृदुला मोरे यांनी निवेदनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या मागण्या रास्त असून त्यावर यथाशीघ्र कार्यवाही करण्यात येईल, तसेच याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपूर कार्यालयाकडे सादर करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

या निवेदन देताना प्रशांत गट्टूवार यांचेसह महेश भाऊ चौधरी,सुनील भाऊ काळे,अनिल भाऊ सोनुले,डॉ.आनंदराव कुळे,भास्कर बुरांडे पाटील,संजू भाऊ चिटमलवार ,चेतन मुंगमोळे,गणेश दुधबळे,मूल तालुक्यातील शेतकरी, ग्रामपंचायत सरपंच,सदस्य व नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. ट्रॅक्टर धारक शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात डिझेल चा पुरवठा करून शेती हंगामात शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia