▪️राज्यस्तरीय बैठकीत कार्यकर्त्यांना आदेश राज्यात बहुजन जनता दलाचा विस्तार व प्रसार आणि प्रचार करावा. पंडितभाऊ दाभाडे

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
पुणे – ( इंडिया 24 न्युज ) : दि सर्वसामान्य नागरिकांच्या आणि शेतकरी शेतमजूर अन्याय ग्रस्त महिला युवा यांच्या व्यथा आणि समस्या जाणून घेऊन त्या प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न करुन बहुजन जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी राज्यात बहुजन जनता दलाचा विस्तार व प्रसार आणि प्रचार करावा असे आवाहन मा श्री पंडितभाऊ दाभाडे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन जनता दल यांनी केले
बहुजन जनता दलाच्या पुणे येथील मध्यवर्ती केंद्रीय कार्यालय बहुजन जनता दलाच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री पंडितभाऊ दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच पार पडली तेव्हा पंडितभाऊ दाभाडे बोलत होते
हर घर बहुजन जनता दल या राज्यस्तरीय अभियानांतर्गत गाव तिथे बहुजन जनता शाखा स्थापन करणे या योजनेनुसार बहुजन जनता दल महिला आघाडी युवा आघाडी वैद्यकीय कामगार आघाडी फिल्मसिटी आघाडी सह बहुजन जनता दल कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याकडे राज्यात बहुजन जनता दलाचा विस्तार प्रसारआणि प्रचारा च्यादृष्टिकोनाने जबाबदारी सोपवण्यात आली आहे असेही बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री पंडितभाऊ दाभाडे यांनी सांगितले
2 ते 3 वर्षापासून बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री पंडितभाऊ दाभाडे हे राज्यातील बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासह सर्व आघाड्याचे जिल्हा अध्यक्ष यांच्यासोबत थेट संपर्क करून सविस्तर माहिती देऊन बैठकीचे आयोजन करीत आहे कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी दलित बहुजन मराठा मुस्लिम बौद्ध अल्पसंख्यांक शोषित पीडित वंचित आणि इतरही घटकांची संपर्क साधून बहुजन जनता दलाचे उद्दिष्ट आणि विचार आणि ध्येयधोरण सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवावे असा आदेश मा श्री पंडितभाऊ दाभाडे यांनी राज्यस्तरीय बैठकीत कार्यकर्त्यांना दिला
यावेळी बहुजन जनता दलाच्या माजी नगरसेविका प्रमोदिनी दावखरे माजी नगरसेवक रामदास डोरले माजी नगरसेवक केशव गंगणे भावराव ताम्हणकर ग्रामपंचायत सदस्य अनिता काळे ग्रामपंचायत सदस्य अंकुश पवार प्रदेश उपाध्यक्ष संजय वानखेडे प्रदेश कैलास परसुरे परदेस सचिव हिम्मतराव पाटील प्रदेश संघटक शांताराम यवतकर विदर्भ प्रदेश अध्यक्ष सुनंदा ठाकरे महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष ज्योती लांजेवार अध्यक्ष कोकण विभाग संजय गायकवाड उमेश यादव किशोर कदम याकुटशहा महेंद्र जाधव शिवाजी महाले शेख याकुब यांच्यासह अनेक बहुजन जनता दलाचे राज्यस्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते असे बहुजन जनता दलाच्या केंद्रीय मध्यवर्ती कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.



