आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️सिंदेवाही हद्दीत प्रतिबंधीत सुंगधीत तंबाखू जप्त, मुख्य तस्कराला ठोकल्या बिड्या..

▪️एकुण २,८४,८४५/- रुपयांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ची मोठी कामगिरी..

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथकास खात्रीशिर गोपनिय माहिती मिळाली की, सिंदेवाही येथील आझाद चौक परिसरातील छुप्या खोल्यांमध्ये अवैध विक्रीच्या उद्देशाने प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि हुक्का शिशा सामग्रीचा मोठा साठा दडवून ठेवण्यात आला आहे.

सदर प्राप्त माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिंदेवाही येथील आझाद चौकातील संशयास्पद ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. या धडक छाप्यादरम्यान मुख्य आरोपी सागर प्रमोदराव केकरे वय ३४ वर्षे, रा. आझाद चौक सिंदेवाही याला पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेवुन सदर ठिकाणाची झडती घेतली असता महाराष्ट्र राज्यात पूर्णपणे प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू आणि हुक्का शिशा तंबाखूचा अवैध साठा असा एकूण रु. २,८४,८४५/- (दोन लाख चौर्याऐंशी हजार आठशे पंचेचाळीस रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन सिंदेवाही यांच्या ताब्यात देण्यात आले.

सदर प्रकरणी पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम ३० (२) (a), २६(२) (i), २६(२) (iv), ५९ सहकलम १२३, २२३, २७५, ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सदर गुन्हयातील पुरवठादार आरोपीचा शोध घेणे सुरु असुन गुन्ह्याचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे स्थानिक गुन्हे शाखाा चंद्रपूर यांचे नेतृत्वात सपोनि श्री दीपक काँक्रेटवार, पोउपनि श्री विनोद भुरले, पोउपनि श्री सर्वेश बेलसरे, पोहवा, गणेश मोहुर्ले, पोहवा. गणेश भोयर, पोहवा. चेतन गज्जलवार, पोहवा. संतोष पेलपुलवार, पोहवा. जयसिंग, पोहवा सचिन गुरनुले, पो. अं. सुमित बरडे, अजित शेंडे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.