▪️ पोलीसांच्या कारवाईस आले यश.. आखिरकार वनिता बिअर बार चा परवाना कायमस्वरूपी रद्द..
▪️बिअर बार च्या नावाखाली कुंटणखाना चालविणे भोवले.. पोलीस अधिक्षकांनी मा. जिल्हाधिकाऱ्यांकडे केला होता प्रस्ताव सादर...

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दिनांक १६/०५/२०२६ रोजी चिमुर पोलीसांना गोपनिय माहिती मिळाली होती की, आझाद वार्ड, चिमुर येथील वनिता बिअर बार अॅण्ड रेस्टॉरेंट ची संचालिका वनिता जगन रंगारी ही तिचे बार चे नावाखाली बारच्या ईमारतीमधील वरील माळयावर बाहेरील महिलांना देहव्यवसायाकरीता प्रोत्साहित करून, त्यांना पैशांचे आमिष दाखवुन त्यांचे कडुन देहव्यापार करवुन घेते व याकरीता त्या मोबदल्यात ग्राहकांकडुन पैसे स्वीकारून त्यातील फार थोडी रक्कम पिडीत महिलेला देवुन रक्कमेचा मोठा भाग ही स्वतःचे स्वार्थाकरीता काढुन घेवुन पिडीतेचे शोषण करीत आहे. अशा माहितीवरून खाजगी ग्राहक पाठवुन सदर बिअर बार वर छापा घातला असता या ठिकाणी देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे दिसुन आले. त्याचबरोबर एका पिडीत महिलेला मुक्त करून सदर बिअर बार ची संचालिका वनिता जगन रंगारी हिचे विरूद्ध महिला पोलीस उपनिरीक्षक दिप्ती मरकाम यांचे तक्रारीवरून पो.स्टे. चिमुर अप क्र. ५०५/२०२६ कलम १४३ (२) भा. न्या.सं. सहकलम ०३,०४,०५,०६,०७ अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ (PITA ACT) नुसार गुन्हा नोंद करून आरोपी महिला वनिता रंगारी हिला अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने सदर महिला आरोपीस चंद्रपुर कारागृहात पाठविलेले आहे.
सदर बिअर बार हा अतिशय दाट वस्तीमध्ये असुन सदर बिअर बार चे आजुबाजुला ०३ मस्जिद व ०१ बुद्ध विहार अशी अतिशय महत्त्वाची धार्मिक स्थळे असल्याचे दिसुन आहे. तसेच या कुंटणखान्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांकडुन परिसरातील महिला, मुली, प्रतिष्ठित लोक यांना जगणे मुश्किल झाले होते. तसेच परिसरातील नागरिकांनी हा बिअर बार बंद करावा याकरीता अनेकदा प्रशासनास लेखी निवेदन दिले होते.
चिमुर पोलीसांनी केलेल्या कारवाई दरम्यान आरोपी वनिता रंगारी ही तिचे बिअर बारच्या नावाखाली कुंटणखाना चालवित असल्याचे व महिलांची स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता शोषण करीत असल्याचे पुराव्यानिशी दिसुन आले. त्यामुळे सदर बिअर बार चा उपयोग हा केवळ कुंटणखान्याकरीता होत असुन या कुंटणखान्याच्या अगदी लगतच्या परिसरात ०३ मस्जिद व ०१ बुद्ध विहार ही अति महत्त्वाची धार्मिक प्रार्थना स्थळे असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सदर बिअर बार चा परवाना रद्द करणेकरीता सखोल व अभ्यासपुर्ण प्रस्ताव पोलीस निरीक्षक दिनेश त्र. लबडे यांनी उपविभागीय



