आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

◼️नागभीड येथील खाजगी रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

 

धनराज सरपाते – सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

सिंदेवाही : (इंडिया २४ न्युज )
नागभिड येथील एका खासगी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून संबंधित रुग्णालयाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गर्भपातासाठी शासन मान्य केंद्र असल्याचा दावा करणाऱ्या या रुग्णालयात सोनोग्राफी अहवाल “प्रॉब्लेमॅटिक” असल्याचे सांगून काही रुग्णांना गर्भपातासाठी सल्ला दिला जात असल्याची तक्रार आहे. तसेच रुग्णांनी इतर डॉक्टरचे अहवाल दाखविल्यानंतर त्यांना वेगवेगळे सल्ले दिले जात असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण होत असल्याचे सांगितले जाते.

काही रुग्णाच्या म्हणण्यानुसार, उपचार व शस्त्रक्रियांच्या खर्चाबाबत वेगवेगळी माहिती दिली जात असून ब्रह्मपुरी येथे ६० ते ७० हजार रुपये तर नागपूर येथे ८० ते ९० हजार रुपये खर्च येतो, असे सांगितले जाते यामुळे रुग्णांमध्ये मानसिक तणाव वाढत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, रुग्णालयाच्या डॉक्टरच्या वर्तणुकीबाबतही काही नागरिकांनी आक्षेप नोंदविला आहे. रुग्णाशी उद्धट भाषेत संवाद साधला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आधीच आजारापणामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांना अतिरिक्त मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकाचे म्हणणे आहे.

याशिवाय डॉक्टरांच्या दवाखान्या बाहेर तपासणी शुल्काचा फलक लावण्यात आला असून सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत २०० रुपये, दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत २५० रुपये आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ३०० रुपये शुल्क आकारले जात असल्याचे नमूद आहे. वेळेनुसार बदलणाऱ्या शुल्क पद्धतीबाबतही नागरिकांमध्ये संभ्रम व नाराजी असल्याचे दिसून येत आहे.

या सर्व प्रकरणाची संबंधित आरोग्य विभागाने व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून, रुग्णालयाच्या कार्यपद्धतीची पडताळणी करावी व दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी चंद्रपूर जिल्ह्यासह नागभीड व सिंदेवाही तालुक्यातील नागरिकाकडून करण्यात येत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.