▪️छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर..
▪️मूल आणि चिमूर येथे रूप-टॉप सोलार आणि स्मार्ट मीटर माहिती संदर्भात शिबिराचे आयोजन..

कार्यकारी संपादक : राज जांभुळकर
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : २३ जुलै २०२६:- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात महावितरण द्वारे संपूर्ण राज्यामध्ये स्मार्ट मीटरची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येत आहे. वीज वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक, अचूक, सुरक्षित आणि आधुनिक करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले असून, या बदलामुळे वीज क्षेत्राला एक नवी दिशा मिळणार आहे. सोशल मीडियावरील अर्धवट माहितीमुळे अनेक ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असला, तरी वस्तुस्थिती अशी आहे की, स्मार्ट मीटर हे ग्राहकांच्या सक्षमीकरणाचे एक महत्त्वाचे साधन आहे.
त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अंतर्गत तहसील कार्यालय, मुल व चिमुर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये महावितरण (MSEDCL) तर्फे माहिती स्टॉल उभारण्यात आला होता. या स्टॉलद्वारे रूफटॉप सोलार (RTS) स्मार्ट योजनेची माहिती दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांना, तसेच अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) व दारिद्र्यरेषेखालील (BPL) ग्राहकांना देण्यात आली.
ग्राहकांना स्मार्ट मीटरचे कार्य, वैशिष्ट्ये व फायदे समजावून सांगण्यासाठी स्मार्ट मीटरचे डेमो किट प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तसेच ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
याप्रसंगी मा. आमदार, बल्लारपूर मतदार संघ, श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी महावितरणच्या माहिती स्टॉलला भेट देऊन स्मार्ट योजना व स्मार्ट मीटरबाबत माहिती जाणून घेतली. त्यांना स्मार्ट मीटरचे फायदे सविस्तरपणे समजावून सांगण्यात आले. तसेच चिमुर येथे मा. आमदार चिमूर विधानसभा श्री. बंटी बांगडिया साहेब, मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर पंत मॅडम यांनी महावितरणच्या माहिती स्टॉलला भेट देऊन स्मार्ट योजना व स्मार्ट मीटरबाबत माहिती जाणून घेतली. त्यांना स्मार्ट मीटरचे फायदे सविस्तरपणे समजावून सांगण्यात आले.



