आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

जागतिक हत्ती दिनी ‘गज लोक’ माहितीपटाचे वन अकादमीत प्रसारण..

मुख्य संपादक श्री तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर, दि. 14 : जागतिक हत्ती दिनानिमित्त वन्यजीव आणि हत्ती संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी, हत्ती प्रकल्पावर व मानव हत्ती संघर्षावर आधारित ‘गज लोक’ या माहितीपटाचे विशेष प्रसारण चंद्रपूर वन प्रबोधिनीत नुकतेच करण्यात आले.

पर्यावरण, वने, व जलवायू परिवर्तन मंत्रालय, भारत सरकार व इंट्याच संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या या माहितीपटाच्या विशेष प्रसारण प्रसंगी चंद्रपूर वन प्रबोधिनीचे अपर संचालक (प्रशिक्षण) उमेश वर्मा, इंट्याच चंद्रपूर अध्यायचे संयोजक प्रवीण निखारे व सहसंयोजक विजयकुमार धांडे, प्रबोधिनीतील उपसंचालक विश्वनाथ चव्हाण व अश्विनी जाधव, सत्र संचालक संभाजी गवळी, प्रमोद सुतळे, रामदास पुजारी, नरेंद्र चेटुले, खुशाल रामगीरकर आदी उपस्थित होते.

भारतीय संस्कृतीतील हत्तीचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व त्याचप्रमाणे वने, पर्यावरण, जैवविविधता रक्षणातील हत्तीचे महत्व दाखविण्याबरोबरच हत्तींचे संवर्धन आणि त्यांच्या अधिवासाचे रक्षण करणेबाबत जनजागृती करणे, शेतकरी व स्थानिक नागरिक आणि हत्ती यांच्यातील संघर्षावर उपाय शोधणे आदि बाबींवर या माहितीपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.

अपर संचालक (प्रशिक्षण) उमेश वर्मा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रवीण निखारे यांनी माहितीपटाबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी संगणकतज्ज्ञ शशीकांत गराडे, जीआयएस तज्ज्ञ गुरुराज, आतिथ्य व प्रशासन व्यवस्थापक राहुल प्राईस, वनक्षेत्रपाल प्रशिक्षण सत्र ४ चे प्रशिक्षणार्थी अधिकारी, मानव वन्यजीव संघर्ष निवारण प्रशिक्षण सत्रातील अधिकारी व प्रथम कौशल्य विकास प्रशिक्षण सत्रांचे प्रशिक्षणार्थी, प्रबोधिनीतील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.