▪️नागभीड पोलीसांनी मौजा कान्पा येथील हनुमान टेकडी परिसरात सुरु जुगार अडयावर टाकली धाड..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. १५/०८/२०२६ रोजी पो.स्टे. नागभीड अंतर्गत मौजा कान्पा येथील टेकडीवरील हनुमान मंदिर परिसरात चालू असलेल्या ५२ पानी जुगार अड्याबाबत गोपनीय माहिती काढुन १) दिपक गंगाधर करुटकर वय ३७ वर्ष, जात कुणबी, धंदा मजुरी, रा. कान्पा ता. नागभिड जि. चंद्रपूर २) लक्ष्मण नेमाजी गोंगल, वय ३५ वर्ष, जात कुणबी, धंदा मजुरी, रा. पांजरेपार ता. चिमूर जि. चंद्रपूर ३) जगदिश दादाजी भुरसे वय ४९ वर्ष जात कुणबी धंदा मजुरी रा. कान्पा ता. नागभीड जि. चंद्रपूर ४) सुधाकर पांडुरंग मुळे वय ४७ वर्ष जात कुणबी धंदा मजुरी रा. पांजरेपार ता. चिमूर जिं. चंद्रपूर ५) दामोदर वासुदेव घ्यार वय ६६ वर्ष जात कुणबी, धंदा मजुरी रा. आजगाव ता. चिमूर जि. चंद्रपूर ६) नितेश बाळकृष्ण मलोडे वय ३० वर्ष जात कुणबी, व्यवसाय वाहन चालक रा. कान्पा ता. नागभीड जि. चंद्रपूर यांचे ताब्यात ५२ तास पत्ते किंमत ००/०० रु., नगदी डावावर ९००/- रु. तसेच आरोपी क्र. १ ते ५ यांचे अंगझडतीत ६०१०/- रु. आरोपींचे घटनस्थळी मिळालेले ६ मोबाईल एकुण किंमत ४१०००/- रु. व जुन्या वापरत्या एकुण ०५ मोटारसायकल किंमत ३३०००० /- रु. असा एकुण ३,७७,९१० रुपयाचा मुददेमाल ५२ तास पत्त्यावर पैशाची बाजी लावून हारजितचा जुगाराचा खेळ खेळताना मिळुन आल्याने नैमुद ०६ आरोपी विरुध्द महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियमान्वये कार्यवाही करण्यात आली.
-सदर कार्यवाही मा. श्री. आयुष नोपानी, पोलीस अधिक्षक, चंद्रपूर, मा. श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपूर, मा. श्री. साहील झरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रम्हपुरी, श्री. रमाकांत कोकाटे, पोलीस निरीक्षक पो.स्टे. नागभीड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि अजिंक्य गोविंदलवार, पोउपनि अनिल डोंगरवार, पोहवा/१९७१ दिलीप चौधरी, पोअं/२३४ जितेंद्र मारबते, पोअं/१७९६ शुभम वनकर यांचे पथकाने केली.



